आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच दुकानांवरील कारवाई; महापालिकेसाठी डोकेदुखी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - न्यायालयाच्या आदेशाने अंबड लिंकरोडवरील भंगार बाजार महापालिकेने उद्ध्वस्त केला असला, तरी काही दुकानांबाबत न्यायालयाचेच स्थगिती अादेश असतानाही त्यावर हाताेडा चालविण्यात अाला अाहेे. कारवाई केलेल्या पाचही दुकानमालकांचा भंगारचा नव्हे तर लोखंडाचा (ट्रेडिंग) व्यवसाय आहे. त्यामुळे त्यांनी पालिका अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला अाहे. 
 
भंगार व्यावसायिकांविरोधात धडक मोहिमेत प्लॉट नंबर २८ वर अभयसिंग चौहान (आकाशगंगा मेटल), अब्दुल समद चौधरी (न्यू वन स्टील), इमरान खान (स्टॅण्डर्ड स्टील काॅर्पोरेशन), धर्मेश्वर दुबे (बालाजी मेटल), सोहेल सय्यद खान (आक्षा स्टील) या पाच व्यावसायिकांचे लोखंड (स्टील, कॉपर) या दुकानदारांना पालिकेने अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस बजावली होती. त्या नोटिसीला उत्तर देत ‘आमचे बांधकाम पालिकेने दिलेल्या परवानगीवर केलेले असून, बांधकाम पाडल्यास पालिकेकडून नुकसानभरपाई घेण्यात येईल’, असे उत्तर १० सप्टेंबरला कार्यकारी अभियंत्यांना लेखी स्वरूपात दिले आहे. या पाचही दुकानदारांनी जिल्हा सत्र न्यायालयातून अतिक्रमण निर्मूलन मोहिमेविरोधात गुरुवारी सायंकाळी वाजता ‘स्टे ऑर्डर’ मिळवत ती रजिस्टर पोस्टाने पालिकेला पाठवली होती. 
 
बातम्या आणखी आहेत...