आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रमिकनगरात पाच वाहनांच्या काचा फाेडल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातपूर - सातपूर काॅलनी परिसरात एकाच रात्री ११ वाहनांची ताेडफाेड करणाऱ्या समाजकंटकांचा तपास करण्यात पाेलिस यंत्रणेला अपयश अाल्याने मंगळवारी सातपूरच्या श्रमिकनगर परिसरात पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती घडली. पहाटे दाेन ते अडीचच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी पाच वाहनांच्या काचा फाेडून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. या घटनेने नागरिकांमध्ये पुन्हा असुरक्षिततेची भावना निर्माण झाली अाहे.

सातपूर काॅलनी परिसरात एकाच रात्रीत ११ वाहनांची ताेडफाेड करण्यात अाली हाेती. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले हाेते. पाेलिसांच्या हाती वाहनांची ताेडफाेड करणाऱ्या दाेघांचे सीसीटीव्ही फुटेज लागले हाेते. मात्र, त्यातून अाराेपींची अाेळख पटवणे शक्य हाेत नसल्याने वाहनांची ताेडफाेड करणारे माेकाटच फिरत अाहेत. याच घटनेची पुनरावृत्ती श्रमिकनगर परिसरात झाली अाहे. मंगळवारी पहाटे घराबाहेर उभ्या असलेल्या पाच वाहनांच्या काचा फाेडण्यात अाल्या. सकाळी हा प्रकार उघडकीस अाल्यानंतर नागरिकांमध्ये समाजकंटकांची दहशत बसली अाहे. या घटनेत अरुण माेरे यांची लाेगान (एमएच १५ डीडब्ल्यू ३९८८), दत्तात्रेय पाटे यांची अाेमनी (एमएच ४१ सी ५२४२), सीताराम धाेत्रे यांची इंडिका (एमएच १५ एएस ९३४०), श्यामराव बैरागी यांची अॅपेरिक्षा (एमएच १५ बी ६९२०) दिगंबर पवार यांची पिकअप या वाहनांचे नुकसान झाले अाहे. पाेलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहायक अायुक्त अतुल झेंडे वरिष्ठ निरीक्षक मनाेज करंजे यांनी श्रमिकनगर परिसरात जाऊन नागरिकांशी चर्चा केली.

दरम्यान, शहरात गुंडागर्दी वाढली असून, चाैकाचाैकात टवाळखाेरांचे टाेळके उभे असतात. पाेलिसांनी गस्त वाढवून गुंडाराज संपुष्टात अाणावे, अशी मागणी प्रभागाचे नगरसेवक दिनकर पाटील नगरसेविका लता पाटील यांनी पाेलिस अायुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडे निवेदना द्वारे केली.
बातम्या आणखी आहेत...