आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"शिक्षणहक्क'साठी अाता २५ पर्यंत मुदत, अारक्षित जागांसाठी पुन्हा मुदतवाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतील गरजू विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये (२५ टक्के) आरक्षित जागांसाठी सुरू असलेली ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या विहित मुदतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. शिक्षण विभागातर्फे प्रवेशाच्या विहित मुदतीत वाढ करण्यात असून, आता २५ एप्रिलपर्यंत अर्ज करता येतील. तर आतापर्यंत एकूण ५९०० जागांसाठी हजार ७६८ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. ऑनलाइन प्रवेश अर्जांची नोंदणी करताना सुरुवातीला तांंत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे शिक्षण विभागाच्या वतीने प्रवेशप्रक्रियेच्या विहित मुदतीत वाढ करण्यात आली असून, २५ एप्रिलपर्यंत प्रवेश अर्जांची नोंदणी करता येणार आहे. शिक्षणहक्क कायद्यांतर्गत राखीव प्रवेशाची प्रक्रिया शाळांमध्ये सुरू आहे. शैक्षणिक वर्ष २०१६ २०१७ यासाठी पूर्व प्राथमिक (नर्सरी) प्राथमिक (पहिली) इयत्तेसाठी प्रवेशासाठी जिल्हाभरातील ५९०० जागांसाठी आतापर्यंत ४७६८ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. गरजू विद्यार्थी या प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे विहित मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवेशासाठी नोंदणी करणे गरजेचे आहे. पालकांच्या मागणीनुसार विहित मुदतीत वाढ करण्यात आली आहे, असे शिक्षणाधिकारी (जि. प.) प्रवीण अहिरे यांनी सांगितले.