नाशिक: महापालिकेचे सन २०१६-१७ या अार्थिक वर्षातील १३७५ काेटी रुपयांच्या अंदाजपत्रकाचा पाया ज्या उत्पन्न वसुलीच्या अंदाजावर अाहे, ताेच अंदाज काेसळून पडण्याची भीती निर्माण झाली अाहे. ११०० काेटी रुपयांचा अंदाज पालिकेने गृहीत धरला असताना जानेवारीपर्यंत जेमतेम ७०० काेटींचा महसूल प्राप्त झाला अाहे. दरम्यान, ४५० काेटी रुपयांचा महसूल येत्या अडीच महिन्यांत मिळाला तरच अायुक्तांनी शिफारस केलेल्या अंदाजपत्रकापर्यंत तरी पाेहोचता येणे शक्य हाेणार अाहे.
पालिकेची अार्थिक अवस्था गेल्या दाेन वर्षांपासून नाजूक असून, अायुक्तांनी सुचवलेले अंदाजपत्रकच प्रत्यक्षात अाणता-अाणता दमछाक हाेत अाहे. जेथे अायुक्तांचेच अंदाजपत्रक व्यवहार्यतेत अाले नाही तेथे स्थायी समिती महासभेने सुचवलेली काेटीच्या काेटी उड्डाणे कागदावरच राहिली अाहे. दरम्यान, यंदा निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे नगरसेवकांनी निधीसाठी अाटापिटा केला.
त्यात स्मार्ट सिटी याेजनेसाठी खर्चाचाही पालिकेवर बाेजा पडला. त्यामुळे महापालिकेला माेठ्या प्रमाणात उत्पन्नाची अाशा हाेती. महापालिकेने यंदा १३७५ रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीवर ठेवले. स्थायी समितीने त्यात तीनशे काेटींची वाढ केली. स्थायी समितीचीच वाढच प्रत्यक्षात लागू हाेणार नसल्याचे बघून महासभेने तर वाढीचा नादच साेडला हाेता.
त्यावेळी सत्ताधारी मनसेवर वाढ केल्यामुळे टीका झाली खरी, मात्र त्यावेळी घेतलेला निर्णय अाता याेग्य असल्याचे सिद्ध हाेत असून, महापालिका अायुक्तांच्या अंदाजपत्रकात सुचवलेला ११०० काेटी रुपयांचाच उत्पन्नाचा अंदाज अाता प्रत्यक्षात येताे की नाही, अशी परिस्थिती अाहे. डिसेंबरअखेरीस सातशे काेटी रुपयेच जमा झाले असून, अाता तीन महिन्यांत उर्वरित साडेचारशे काेटी रुपये कसे वसूल हाेतात, याकडे लक्ष लागले अाहे.
घरपट्टी, पाणीपट्टीचे ७९ काेटी रखडले
महापालिकेचेघरपट्टीपाेटी ११० काेटी रुपयांचे उद्दिष्ट हाेते. त्यापैकी ६६ काेटी ७५ लाख रुपये अातापर्यंत वसूल झाले अाहे. पाणीपट्टीपाेटी ३८ काेटींचे उद्दिष्ट असताना यंदा मात्र १८ काेटीच वसूल झाले अाहे. विशेष म्हणजे, दाेन्ही मिळून १६८ काेटी अपेक्षित असताना ८४ काेटी वसूल झाल्यामुळे अाता उर्वरित ८४ काेटी दाेन महिन्यांत वसुलीचे अाव्हान अाहे.
घरपट्टी पाणीपट्टीचे कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्यामुळे अाता वसुली कशी करायची, हाही पेच अाहे. सुदैवाने पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी नाेटाबंदीनंतर हजार पाचशेच्या बंद झालेल्या नाेटा तब्बल तीन अाठवडे स्वीकारण्याची मुभा दिल्यामुळे महापालिकेला ३० काेटींपर्यंत अायतीच वसुली झाली हाेती.
एलबीटीतून १८० काेटी येणार
महापालिकेला ५० काेटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्याकडून ३० काेटींच्या अासपास मासिक एलबीटी प्राप्त हाेता. दुसरीकडे शासनाकडून ३१ काेटी ६४ लाख रुपयांचे अनुदान एलबीटीपाेटी येते. या पार्श्वभूमीवर एलबीटीतून १८० काेटी येतील, मात्र उर्वरित पैशांचे काय, असा प्रश्न अाहे.