आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुरामुळे गोदाकाठी तारांबळ; व्यावसायिकांचे स्थलांतर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मंदिरांत साचलेले पाणी. उघड्यावर होणारा दशक्रिया विधी. स्थलांतरित झालेला भाजीबाजार. हातगाडी व्यावसायिकांची सुरू असलेली एकच धावपळ अन् उदरनिर्वाहाचे साधन सांभाळताना महिला व्यावसायिकांची होत असलेली कसरत. हे चित्र आहे गोदाकाठचे.

चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे नाशिककरांची तृष्णा भागविणार्‍या गंगापूर धरणातील जलसाठय़ात वाढ झाल्याने गुरुवारी गोदावरीला पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. प्रचंड प्रमाणात आलेल्या पुराच्या पाण्यामुळे गोदाकाठचे जनजीवन पुरते विस्कळित झाले. गोदावरीला आलेल्या या पाण्याचा फटका या ठिकाणी असलेल्या व्यावसायिकांना चांगलाच बसला. महापालिका प्रशासन आणि पोलिस यंत्रणेच्या आवाहनावरून गोदाकाठच्या सर्व व्यावसायिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या व्यवसायावरही परिणाम झाला असला तरी या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत मिळेल त्या ठिकाणी दुकाने थाटून ते आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.