आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाने उघडीप दिल्याने स्थिती पूर्वपदावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील दोन दिवस पूरजन्य परिस्थितीनंतर नदीकाठालगत आणि इतर ठिकाणी पुरामुळे बाधित झालेल्या ठिकाणांवरील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत अाहे. रविवारी सूर्यदर्शन झाल्याने पूरग्रस्त भागातील नागरिकांसह व्यावसायिकांना दिलासा मिळाला. व्यावसायिकांकडून व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत.
गोदावरीला आठवड्यात दोन वेळा पूर अाल्याने नदीकाठालगतच्या घरांमध्येे पाणी शिरले. घरातील सर्व वस्तू पाण्यात वाहून गेल्याने बेघर झालेल्या या पूरग्रस्तांना शहरातील सेवाभावी संस्था, महापालिका प्रशासन, पोलिस प्रशासनासह राजकीय पदाधिकाऱ्यांकडून मदत मिळत आहे. मात्र, या मदतीच्या आशेवर राहता बहुतांशी कुटुंबीय आपल्या घराकडे परतले. सराफ बाजार, भांडी गल्ली, रामकुंड, सरदार चौक, दहीपूल, सरकारवाडा, फूलबाजार या परिसरात व्यावसायिकांकडून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या साहित्याची जमवाजमव सुरू करण्यासाठी लगबग सुरू होती. पंचवटी परिसरातील मालेगाव स्टॅण्ड, रामकुंड अाणि सरदार चौक परिसरातील नागरिकांना पुराच्या पाण्यामुळे व्यवसाय सुरू करता आले नाहीत.

रविवारीही दुताेंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी असल्याने रामकुंड परिसरातील व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात अाला हाेता. या ठिकाणी धार्मिक विधी रस्त्यांवर करण्यात अाल्याचे निदर्शनास येत होते. पुराच्या पाण्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छता मोहीम राबवली जात नसल्याचे कारण पुढे करून स्वच्छता करण्यास आरोग्य विभागाकडून चालढकल केली जात आहे. सरदार चौक, वाघाडी, दहीपूल, भांडी बाजार अादी परिसरात चिखल साचून आहे. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची दाट शक्यता असूनदेखील आरोग्य विभागाकडून कुठल्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांनी आरोग्य विभागावर नाराजी व्यक्त केली अाहे.

पुरामुळे स्वच्छता मोहिमेला अडथळा
^गोदावरीला पूर अद्याप कमी झालेला नाही. स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार होती. मात्र, आठवड्यात दोन वेळा पूर आल्याने मोहीम लांबणीवर पडली. पूर कमी झाल्यानंतर मोहीम सुरू केली जाईल. आरोग्य विभागाला सूचना केल्या आहेत. जेथे चिखल आहे त्या ठिकाणी स्वच्छता करण्याचे आदेश दिलेआहेत. - रुची कुंभारकर, सभापती, पंचवटी प्रभाग

बातम्या आणखी आहेत...