आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

के. के. वाघ ते जत्रा हॉटेलदरम्यान २१२ कोटी खर्चाच्या उड्डाणपुलास मान्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- के.के. वाघ ते जत्रा हॉटेलदरम्यान २.३ किलोमीटर उड्डाणपुलासह विविध कामांना अखेर तत्त्वतः मान्यता मिळाली. उड्डाणपुलाला जवळपास २१२ कोटी रुपयांचा खर्च लागणार असून, त्यासाठीचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी सल्लागारांची नेमणूक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यातील कामे ऑक्टोबरनंतर सुरू होतील. उड्डाणपुलाचा सविस्तर अहवाल आल्यानंतर कामास प्रशासकीय मान्यता दिली जाईल ते महिन्यांत काम सुरू होईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावर उड्डाणपूल तयार होऊनही द्वारका सर्कल, इंदिरानगर, लेखानगर, के. के. वाघ महाविद्यालय, अमरधाम क्रॉसिंग, जत्रा हॉटेल क्रॉसिंग अनेक मुख्य रस्त्यांवर वाहतुकीच्या कोंडीमुळे प्रवाशांचा तासन््तास खोळंबा होतो. के. के. वाघ महाविद्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्ग दररोज शेकडो विद्यार्थी अाेलांडतात. तसेच, अमरधाम क्रॉसिंगलगत शहरांतर्गत ३० मीटरचा रिंगरोड महामार्गाला क्रॉस होतो. तसेच, जत्रा क्रॉसिंगला बाह्य मार्गावरील नाशिक शहराचा ६० मीटर रिंगरोड महामार्गाला क्रॉस होतो.

रस्त्यांच्या या क्रॉसिंगमुळे या भागांत अनेक अपघात घडले आहेत, तसेच या महामार्गाच्या आराखड्यात अनेक त्रुटी राहून गेल्या होत्या. खासदार हेमंत गोडसे यांनी यासंदर्भात विभागीय इंजिनिअर राजीव सिंग, प्रकल्प अधिकारी खोडसकर कार्यकारी अभियंता यांच्यासोबत पाहणी करून हे सर्व विषय निदर्शनास आणून दिले. तसेच, या सर्व क्रॉसिंगवर आजवर किती अपघात झाले त्यामध्ये किती नागरिकांचे मृत्यू झाले हे संबंधित आडगाव पंचवटी पोलिसांच्या लेखी पुराव्यासह त्यांनी दाखविले होते.

खासदार गाेडसेंच्या पाठपुराव्याला यश
यासंपूर्ण महामार्गाची पाहणी खासदार हेमंत गाेडसे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केली हाेती. अनेक सूचना पाहणीदरम्यान करण्यात आल्या होत्या तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला होता. त्यासंदर्भात गोडसे पाठपुरावा करत होते. जुलै रोजी झालेल्या कार्यकारी समितीच्या २८५ व्या बैठकीत अखेर ३१ कोटी ३५ लाख हे एन्ट्री रेस्ट रॅम्प काही ठिकाणी सब-वे, हायमास्ट या कामांना मान्यता देण्यात आल्याने गाेडसेंच्या पाठपुराव्याला यश अाले अाहे.
बातम्या आणखी आहेत...