आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Food Drugs Administration Give Memo To Inactive Officers

अन्न औषध प्रशासन देणार कामचुकार अधिकाऱ्यांना ‘मेमो’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कामचुकारअधिकाऱ्यांवर कारवाई करावी, यासाठी आम आदमी पक्षातर्फे शुक्रवारी अन्न औषध प्रशासन (एफडीए) कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. त्या वेळी कामचुकार अधिकाऱ्यांना ‘मेमो’ पाठविणार असल्याचे आश्वासन सहायक आयुक्त बेंडकुळे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
शहरातील काही प्रमुख दुकानांसह गल्लीबोळांतील काही दुकानांत मुदतबाह्य खाद्यपदार्थ इतर वस्तूंची विक्री केली होत असूनही याबाबत तक्रार घेण्यास ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत असल्याच्या बाबीवर ‘डी. बी. स्टार’ चमूने ‘स्टिंग ऑपरेशन’द्वारे प्रकाश टाकल्यानंतर ‘आप’ने आंदोलन केले.

नफा कमावण्याच्या उद्देशाने काही दुकानदार मुदतबाह्य गृहाेपयाेगी खाद्यपदार्थ इतर वस्तूंची विक्री करीत असल्याने नागरिकांच्या जीविताशीच खेळ सुरू असल्याची धक्कादायक बाब मंगळवारी ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत आढळून आली होती. शहरातील काही दुकानांमधून निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ, मुदतबाह्य खाद्यपदार्थ वस्तूंची विक्री केली जात असल्याची माहितीही मिळाली होती. या माहितीची सत्यता पडताळण्यासाठी मंगळवारी सकाळी शहरातील काही भागातील नामांकित किराणा दुकानांत काही किराणा साहित्य खरेदी करण्यात आल्यानंतर या धक्कादायक प्रकारावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र, याबाबत तक्रारी घेण्यास अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याचेही समोर आले होते. या प्रकरणाबाबत गंभीर दखल घेत शुक्रवारी आम अदमी पक्षाच्या वतीने ‘एफडीए’ कार्यालयाबाहेर आंदोलन करून कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. त्यावर अशा अधिकाऱ्यांना ‘मेमो’ पाठविणार करणार असल्याचे आश्वासन सहायक आयुक्त बेंडकुळे यांनी दिले.
कारवाईचे दिले आश्वासन..
अन्नआैषध प्रशासन या विभागातील अधिकारी तक्रार घेण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे शहरात गुटखा इतर पदार्थ विक्री केले जात आहेत. अशा कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी सहायक आयुक्तांकडे केल्यानंतर त्यांनी कडक कारवाईचे आश्वासन दिले आहे. जितेंद्रभावे, जिल्हा समन्वयक, आप