आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाद्यविश्वकोश अन् ‘मनोहरी’ भ्रमंती

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - भारतीय खाद्य व्यंजनांची एकत्र माहिती असलेल्या तीन भाषांतील खाद्यकोशाचे मे महिन्यात प्रकाशन होणार असून या व्यंजनांच्या प्रसारासाठी प्रसिद्ध पाकतज्ज्ञ (शेफ) विष्णू मनोहर मे महिन्यांपासून ‘खाद्य भ्रमंती’ वर निघणार आहेत. प्रथमच भारतीय व्यंजनांच्या 24 हजारांवर रेसेपीपची माहिती एकाच खंडात भारतीय खवय्यांना मिळणार आहे.
भारतीय पाककलांची माहिती एकत्र संकलीत करण्यासाठी मनोहर यांनी या विश्वकोशाच्या निर्मितीचे काम हाती घेतले होते. विश्वकोश तयार झाला असून, जवळपास हजार पानांच्या या विश्वकोशात देशातील विविध राज्यांच्या पाककृतींचा समावेश करण्यात आला आहे. मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशा तिनही भाषांमध्ये हा कोश तयार करण्यात आला असून, अनेक दुर्मिळ रेसेपीजचा यात समावेश आहे. भारतीय खाद्य व्यंजनांचा इतिहास व त्यांच्या प्रगतीचा आढावाही यात घेण्यात आला आहे. मुळाक्षरांवरून (अल्फाबेट्स) कोशात विविध पदार्थांची नोंदणी करण्यात आली आहे. कोणत्या प्रांतात गेल्यावर कोणता पदार्थ चाखावा याचाही समावेश यात करण्यात
आला आहे.
व्यंजनांसाठी खाद्य भ्रमंती
भारतीय खाद्य पदार्थांची तुलना इतर कोणत्याही देशातील खाद्य पदार्थांशी होऊ शकत नाही. काळाच्या ओघात भारतीय व्यंजनं, मसाले यांची रेसेपी बदलत गेली. या सगळ्यांचा संग्रह एकाच पुस्तकात असावा, असे मला वाटत होते. याच संकल्पनेतून विश्वकोश तयार करण्यात आला आहे. मे महिन्यात भारतीय व्यंजनांच्या प्रचारासाठी मी भारत दौ-यावर अर्थात ‘खाद्य भ्रमंतीवर’ निघणार आहे. देशातील प्रत्येक शहरात या विश्वकोशाचे प्रकाशन केले जाणार आहे. विष्णू मनोहर, विश्वकोश निर्माते, प्रसिद्ध पाककला तज्ज्ञ