आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Food Security Officer Use St For Travelling In Nasik

'अन्न आैषध'च्या कर्मचाऱ्यांना 'एसटी'चा आधार, वाहन नसल्याने बसने करतात प्रवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गेल्याकाही दिवसांपासून अन्न अौषध प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात जोरदार तपासणी मोहीम सुरू आहे. मात्र, या विभागाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांकडे हक्काचे वाहन नसल्यामुळे जिल्ह्यात कुठेही छापा टाकण्यासाठी जाताना त्यांना 'एसटी'चा आधार घ्यावा लागत आहे. या विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने त्याचा अतिरिक्त ताण सध्या येथे कार्यरत सात कर्मचाऱ्यांवर पडत असल्याचे चित्र आहे.

अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात भेसळयुक्त अन्न मिठाईवर कारवाई करण्याची माेहीम सुरू अाहे. या माेहिमेंतर्गत शहरात काही दिवसांपूर्वी विविध ठिकाणी छापे टाकून लाखोंचा गुटखा जप्त करण्यात आला. तसेच, सिंहस्थात येणाऱ्या भाविकांना चांगले अन्न मिळावे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून जनतेस स्वच्छ, निरोगी योग्य अन्न उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. सिंहस्थात जगभरातून भाविक येतात. या पार्श्वभूमीवर शहरातील पंचवटी, तपोवन गोदाघाट परिसरासह शहरात या मोहिमेंतर्गत प्रशासनाच्या पथकामार्फत खाद्यपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, विक्री, वाहतूक विक्री होणाऱ्या ठिकाणी भेटी देऊन स्वच्छतेच्या दृष्टीने तपासण्या करून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहेत. याचप्रमाणे जिल्ह्यातील कोणत्याही भागातून भेसळ झाल्याची तक्रार आल्यास घटनास्थळी छापा टाकण्यासाठी एसटी बसची वाट पाहत अधिकाऱ्यांना बसथांब्यांवर थांबण्याची नामुष्की वाट्याला येत आहे. कित्येक वेळा सायंकाळी किंवा रात्री छापा टाकायला जावे लागते, अशा वेळी एसटीने प्रवास करणे म्हणजे डोकेदुखीच ठरते. या ठिकाणी कर्मचारी २४ तास कामावर कार्यरत असतात. अगदी सुटीच्या दिवशीही या कर्मचाऱ्यांना कारवाई करण्यासाठी जावे लागते. यामुळे या विभागाचे सर्व काम एसटीवर अवलंबून आहेत.

सिंहस्थात विशेष मोहीम
सिंहस्थकालावधीत सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अन्नसुरक्षा मानदे अधिनियम २००६ आणि नियम नियमन २०११ मधील तरतुदीनुसार मावा, खवा तसेच मेवा-मिठाई, स्वीटमार्ट इत्यादी विक्री करणारे अन्न व्यावसायिक, अनधिकृत मांस उत्पादक, वाहतूकदार विक्रेते तसेच उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर सिंहस्थाच्या कालावधीत कठाेर कारवाई करण्यात येईल.

पाच अधिकारीच कार्यरत
सध्याअन्न औषध प्रशासन विभागात सुरक्षा अधिकारी विवेक पाटील, प्रदीप कुटे, सुवर्णा महाजन, अमित रासकर, प्रशांत लाेहार हे पाच अधिकारी कार्यरत आहेत.

भाड्याने घ्यावी लागताहेत प्रशासनाला वाहने...
^सध्या अन्न आैषध विभागात कार्यरत कर्मचारी संख्या कमीच आहे. याबाबत वरिष्ठांना प्रस्ताव दिला आहे. तसेच, जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी छापा टाकण्यासाठी कर्मचाऱ्यांना जाण्यास एसटी बसने किंवा भाड्यानेच वाहने घ्यावी लागतात.
- चंद्रकांत पवार, सहायक आयुक्त, अन्न आैषध प्रशासन विभाग