आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता पाण्यासाठीही मोजावे लागणार युनिटप्रमाणे पैसे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- नागरिकांकडून होणाऱ्या पाण्याच्या अपव्ययाला काही प्रमाणात लगाम लागावा, तसेच पाण्याची बचत होतानाच पाण्याची किंमत कळावी, या हेतूने महापालिका क्षेत्रातील नळांवर मीटर लावण्याचा निर्णय घेतला आहे. याअनुषंगाने होणाऱ्या महासभेत या निर्णयावर चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. यावर नगरसेवकांचे एक मत होते की, या महत्त्वपूर्ण प्रस्तावाचा फियास्को होतो, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
राज्यात अनेक महापालिका नगरपालिकांमध्ये नळांना मीटर लावले आहे. मीटर लागल्यानंतर झालेल्या युनिटप्रमाणे पाण्याचे देयक द्यावे लागणार आहे. त्यामुळे जेवढी वीज जाळाल, तेवढे देयक भरा यानुसार पाण्याची उचल नागरिकांना करावी लागेल. तूर्तास नळांना तोट्याच नाहीत. त्यामुळे घरात पाणीसाठा केल्यानंतर गाडी धुण्यापासून ते स्वच्छतागृहात पाणी सोडण्याचे काम सर्रासपणे केले जाते. त्यामुळे उपमहापौर विनोद मापारी यांनी नळांना मीटर लावण्याचा प्रस्ताव विषय पत्रिकेत घ्यावयास लावला. या विषयावर २७ मे रोजी होणाऱ्या महासभेत चर्चा करून मंजुरी दिली जाणार आहे. मनपा क्षेत्रातील नळांना मीटर लावल्यास पाण्याची बचत होईल, अपव्ययही टळेल, अशी अपेक्षा उपमहापौर विनोद मापारी यांनी व्यक्त केली आहे.
तूर्तास १८०० रुपये पाणीपट्टी आकारली जाते. दरडोई १०० लीटर पाणीपुरवठा लक्षात घेतल्यास एका कुटुंबासाठी एका दिवसाला ४०० लीटर, महिन्याकाठी १२ हजार लीटर पाण्याची उचल केली जाईल. दहा रुपये युनिटचा दर निश्चित केल्यास हे देयक १७०० रुपयांपर्यंत येईल. परंतु, पाण्याची अधिक उचल केल्यास अधिक देयक येईल.
१० ते १२ रुपये युनिट आकारण्याची शक्यता : अकोलापाणीपुरवठा योजना ही मनपा स्वत: चालवत असल्यामुळे दर आकारण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार संपूर्णपणे महासभेला आहे. त्यामुळे महासभा प्रती युनिट किती दर निश्चित करणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. परंतु, विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १० ते १२ रुपये प्रती युनिट दर निश्चित केले जाण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, एक हजार लीटरचे एक युनिट...
बातम्या आणखी आहेत...