आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकराच्या विरहात विदेशी साधिकेने धम्मगिरीत मांडला ठिय्या; \'मला एकदा तरी त्याला भेटू द्या\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इगतपुरी- इगतपुरी शहरातील विपश्यना विश्व विद्यापीठ (धम्मगिरी ) येथे अमेरिका येथून आलेल्या सेविकेने  सोमवारी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत धम्मगिरीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा रक्षकांच्या सावधगिरीने तिचा प्रयत्न फसला. तिने  मुख्य प्रवेशद्वाराकडून पळ काढत धम्म तपोवन गेटकडे मोर्चा वळवल्याने ही विदेशी सेविका प्रेमप्रकरणावरून  पुन्हा चर्चेत आली आहे. 
  
दहा वर्षांपासून न्यूयॉर्क येथून कॅटरिन ऊर्फ जानकी नामक महिला साधना करण्यासाठी व सेवा  देण्यासाठी इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात येत आहे. या ठिकाणी सेवा करत असताना विजय  अग्रवाल (धम्मगिरीतील सेवक) यांच्या  प्रेमात ती पडली. ती इतकी प्रेमवेडी झाली की ती नेहमी या व्यक्तीच्या संपर्कात येण्यासाठी काहीही करण्यास तयार होत असे. गेल्या १५ दिवसांपासून  सतत ह्या परदेशी पाहुणीला धम्मगिरीच्या प्रवेशद्वारावर चिंताग्रस्त पाहून अनेक नागरिकांना प्रश्न पडला. नागरिकांनी विचारपूस केली असता ही सेवक असून ,काही कारणास्तव तिला प्रवेश बंद असल्याचे  सुरक्षा रक्षकांनी  सांगितले. दरम्यान विश्वस्तांनी तिची समजूत काढून घरी जाण्यास सांगितले.मात्र ,तिने  नकार देत मी प्रियकराची  गेटवरच वाट पाहते असे सांगून ठिय्या  मांडला.  
 
दरम्यान, अनेक दिवस झाले तरी कॅटरिन परत जात नसल्याने अखेरीस पोलिसांची मदत घेत तिला  शनिवारी समजावले. ती त्यावेळी निघून गेली. नंतर पुन्हा रविवारी हजर झाली. अखेर पाेलिसांच्या मदतीने तिला रेल्वे स्थानकात नेऊन साेडण्यात अाले.रविवारी मुंबईला पोहाेचूनही तिचे प्रेमवेड स्वस्थ बसू देईना. साेमवारी  दुपारी ४ वाजेच्या सुमारास एका कारमध्ये मागील सिटखाली लपून तिने विपश्यना केंद्रात येण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा रक्षकांच्या सावधगिरीमुळे ती अात प्रवेश करू शकली नाही. मात्र दोन बॅगा व इतर सामान विपश्यना केंद्राच्या गेटवर ठेवून तिने ठिय्या दिला.  
 
सुरक्षा रक्षकांचे हाल   
या सर्व प्रेमनाट्यात  सुरक्षा रक्षकांना कसरत करावी लागत आहे. धम्मगिरीत  रोज अनेक पर्यटक हे चारचाकी वाहने घेऊन येत असतात. या वाहनामागे ही सेविका जात असल्याने तिला अडवण्यासाठी धावपळ करावी लागते.  त्यात ठिकाणी सर्व पुरुष सुरक्षा रक्षक असल्याने या साधिकेला रोखण्यासाठी सर्व सुरक्षा रक्षक साखळी बनवत तिला रोखून धरत असल्याचे चित्र १५ दिवसांपासून दिसत आहे.
 
मला व्यवस्थापकांना एकदा तरी भेटू द्या   
- मी अनेक वर्षांपासून या ठिकाणी सेवा देण्यासाठी येत आहे. मला फक्त एकदा धम्मगिरीचे व्यवस्थापक सावलाजी आणि माझे प्रियकर विजय यांना भेटू द्यावे, अशी मी विनंती केली आहे. मात्र, मला प्रवेश दिला जात नसल्याने मी गेटवर विजयची वाट पाहत आहे. तो नक्कीच मला भेटायला येईल अशी  खात्री आहे.  कॅटरिन ऊर्फ जानकी, सेविका, धम्मगिरी   
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कॅटरिन उर्फ जानकी सुटकेस घेऊन थांबली धम्मगिरीबाहेर...
बातम्या आणखी आहेत...