आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनविभागाचा ‘राेपे अापल्या दारी उपक्रम’, राेपे देणार अल्प दरात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राेप वाटप केंद्राच्या उद‌्घाटनप्रसंगी परदेशी पाहुण्यांना राेपे देताना उपवनसंरक्षक रामानुजन. समवेत शेखर गायकवाड, स्वप्निल घुरे, प्रशांत खैरनार, रवी साेनार, अार. जी. वाघ, विनय पाटील अादी. - Divya Marathi
राेप वाटप केंद्राच्या उद‌्घाटनप्रसंगी परदेशी पाहुण्यांना राेपे देताना उपवनसंरक्षक रामानुजन. समवेत शेखर गायकवाड, स्वप्निल घुरे, प्रशांत खैरनार, रवी साेनार, अार. जी. वाघ, विनय पाटील अादी.
 नाशिक-  पर्यावरण संवर्धनाच्या उदात्त हेतूने वन विभागाच्या वतीने येत्या ते जुलै राेजी राज्यात चार काेटी राेपांची लागवड करण्यात येणार अाहे. या माेहिमेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ‘राेपे अापल्या दारी’ या उपक्रमाचा रविवारी (दि. २५) शुभारंभ करण्यात अाला. या उपक्रमांतर्गत येत्या जुलैपर्यंत नागरिक जास्तीत जास्त पाच अाणि सामाजिक संस्था जास्तीत जास्त २५ राेपे सवलतीच्या दरात खरेदी करु शकतील. सात ते दहा रुपयांच्या दरम्यान यांतील बहुतांश राेपांची किंमत अाहे. ही राेपे घरपाेच मिळण्याची व्यवस्था वन विभागाने वृक्ष मित्रांमार्फत केली अाहे. 
 
पर्यावरण संवर्धन अाणि तपमानवाढ हवामानातील बदलावर उपाय याेजण्यासाठी वनविभागाच्या वतीने २०१७ ते २०१९ या कालावधीत ५० काेटी वृक्ष लागवड करण्यात येणार अाहे. याच अंतर्गत यंदा ते जुलै दरम्यान राज्यभरात चार काेटी इतकी राेप लागवड करण्यात येणार अाहे. गेल्या वर्षी या काळात २.८३ काेटी इतकी लागवड करण्यात अाली हाेती. राेप लागवडीच्या कामासाठी वनविभाग ग्रामपंचायत, महसूल विभाग, स्वयंसेवी संस्था अादींचा सहभाग घेतला जाणार अाहे. 
 
राेपवाटप केंद्राचे उद‌्घाटन : मुख्यवनसंरक्षक यांच्या कार्यालय अावारात राेप वाटप केंद्राचे उदघाटन उपवनसंरक्षक (पूर्व भाग) रामानुजन अापलं पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष शेखर गायकवाड यांच्या हस्ते करण्यात अाले. या प्रसंगी संस्थेचे सदस्य, गिव्ह संस्थेचे सदस्य तसेच सहाय्यक वनसंरक्षक स्वप्निल घुरे, वनपरीक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार, रवी साेनार, वनपाल अार. जी. वाघ, शीतल तांबे, जगताप, विनय पाटील अादी उपस्थित हाेते. तसेच उपवनसंरक्षक अावारातील केंद्राचे उद‌्घाटन विभागीय वनाधिकारी भास्कर पवार यांच्या हस्ते करण्यात अाले. 

या ठिकाणी मिळतील सवलतीच्या दरात राेपे 
- मुख्य वनसंरक्षक कार्यालयाचे अावार, त्र्यंबकनाका. 
- उपवनसंरक्षक पश्चिम भाग कार्यालयाचे अावार, हाॅटेल ग्रीन व्हयू समाेर, त्र्यंबकराेड. 
- जवाहरलाल नेहरु वनाेद्यान, पांडवलेणी, मुंबई- अाग्रा महामार्ग. 
- गंगापूर मध्यवर्ती राेपवाटीका, हाॅटेल गंमत जंमत शेजारी. 
- इंदिरा नगर जाॅगिंग ट्रॅक, इंदिरानगर. 
 
या राेपांची विक्री 
जांभूळ,अांबा, चिंच, कडूनिंब, विलायती चिंच, करवंद, अावळा, हिरडा, बेहडा, कदंब अादी. 
 
वृक्षमित्रांमार्फत राेपे पाेहचविण्याचे काम 
राेपे खरेदी करणे सुकर असले तरीही त्याची वाहतूक घरापर्यंत वा इच्छित स्थळापर्यंत करणे जिकरीचे ठरते. या पार्श्वभूमीवर वन विभागाने यंदा ‘राेपे अापल्या दारी’ उपक्रम सुरु केला अाहे. या उपक्रमात २५ जून ते जुलै या दरम्यान नाशिक शहरातील पाच केंद्रांमध्ये राेपे उपलब्ध करुन देण्यात अाली अाहे. नागरिक अावश्यकतेनुसार जास्तीत जास्त पाच अाणि सामाजिक संस्था जास्तीत जास्त २५ राेपे सवलतीच्या दरात खरेदी करु शकतील. ही राेपे नागरिकांनी सांगितलेल्या ठिकाणापर्यंत वृक्ष मित्रांपर्यंत पाेहचविण्यात येतील. 
बातम्या आणखी आहेत...