आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी अर्थमंत्री जयंत पाटील राष्ट्रवादीचे नाशिक शहर जिल्हा प्रभारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक-  माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या तुरुंगवासानंतर अडचणींचा सामना करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला उभारी देण्यासाठी आता माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांची नाशिकच्या शहर जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भविष्यातील लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने पाटील काय रणनीती अाखतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 
 
मार्च २०१६ पासून छगन भुजबळ समीर भुजबळ विविध आक्षेपांखाली तुरुंगात आहेत. छगन भुजबळांनंतर संघटनेत सर्वमान्य नेतृत्त्व पुढे आले नसल्याने काही काळ जितेंद्र आव्हाड यांच्याकडे प्रभारीपदाची सूत्रे होती. मात्र, त्यांनाही त्यात फारसे लक्ष देता आलेले नाही. महापािलका जिल्हा परिषद निवडणुकीत सुप्रिया सुळे, अजित पवार खुद्द पक्षप्रमुख शरद पवार यांनी तळ ठोकून पक्षाला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. अनेक नेत्यांच्या हेकेखोरपणामुळे हाता-तोंडाची सत्ता गेली. आता या पार्श्वभूमीवर पाटील यांच्याकडे संघटनात्मक सूत्रे सोपविण्यात आली आहेत. दरम्यान, रविवारी (िद. २४) राष्ट्रवादी भवनात दुपारी चार वाजता जयंत पाटील शहर जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत. 
बातम्या आणखी आहेत...