आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळांना ‘मनसे’ साकडे, मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी नेतृत्त्व करण्याची विनंती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 1052 कोटी रुपयांची जबाबदारी राज्य शासनाने घ्यावी, ही मागणी मुख्यमंत्र्यांपुढे मांडण्यासाठी जाणा-या शिष्टमंडळाचे नेतृत्व आपण करावे, अशी विनंती मनसेच्या पदाधिका-यांनी माजीमंत्री छगन भुजबळ यांना गुरुवारी (दि. 6) केली. यावर भुजबळ यांनी सर्वपक्षीय बळ लावण्याची गरज असल्याचे सांगत तसे असेल तर मुख्यमंत्र्यांकडून वेळ घेऊन तातडीने चर्चा करू, असे आश्वासनही दिले.
कुंभमेळा तोंडावर असून, शासनाने शिखर समितीच्या बैठकीचा संदर्भ देत मंजूर असलेल्या १०५२ कोटींतील दोन तृतियांश निधी उभारण्याची जबाबदारी महापालिकेवर सोपवली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी या निर्णयाविरोधात पालिकेच्या पदाधिका-यांनी जोरदार विरोध केला होता. त्यावेळीही तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांना तत्कालीन माहापौर यतिन वाघ यांनी निवेदन दिले होते. भुजबळ यांनी सर्वांनी जोर लावला तर निधी मिळेल, असे सांगत पक्षीय भिंती दूर करून एकत्र या, असे स्पष्ट केले होते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीची सत्ता गेल्यानंतर अचानक गुरुवारी पालिकेतील सत्ताधारी मनसे-अपक्ष वा त्यांना पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भुजबळ यांची भेट घेतली. या वेळी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरमित बग्गा, स्थायी समितीचे सभापती अॅड. राहुल ढिकले, अपक्ष गटनेते संजय चव्हाण, राष्ट्रवादीच्या गटनेत्या कविता कर्डक, प्रकाश लोढें हरिभाऊ लोणारी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. या वेळी 1052 कोटींतील250 कोटी पालिकेला मिळाल्याचे सांगत उर्वरित 750 कोटींची उभारणी राज्य शासनाने करावी, अशी मागणी करण्यात आली. भुजबळ यांनी त्वरित मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी वेळ मिळवताे, असे सांगत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ तयार करावे, अशी सूचना केली.
नेतृत्वासाठी साकडे
सिंहस्थाचाविषय सर्वांचा आहे. त्यामुळे भुजबळांना ज्येष्ठ आमदार म्हणून सर्वपक्षीयांचे नेतृत्व करण्यासाठी साकडे घातले. त्यास त्यांनी तयारी दर्शवली असून भाजप शसेनेचे पदाधिकारी नगरसेवकही शिष्टमंडळात असतीलच. -अशोक मुर्तडक, महापौर
सिंहस्थ निधीबाबत माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याशी गुरुवारी चर्चा करताना महापौर अशोक मुर्तडक यांच्यासह मनसे, अपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी.