आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री गावित अत्यवस्थ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - माजी वैद्यकीय व उच्च शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांची साेमवारी सायंकाळी प्रकृती बिघडल्यामुळे मुंबई नाका येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, गावित यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे निकटवर्तीयांचे म्हणणे असून, मेंदूशी संबंधित आजारावर उपचारही सुरू असल्याचे सांगितले जाते.

नंदुरबारवरून आलेले गावित नाशिकमध्ये आराम करून साेमवारी रात्री मुंबईकडे चालले होते. मात्र अचानक घाेटी टाेलनाक्याजवळ फिट आल्यामुळे त्यांना तातडीने नाशिकमध्ये उपचारासाठी आणण्यात आले. पहाटेपर्यंत त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचेही सूत्रांचे म्हणणे हाेते. मात्र, त्यानंतर तातडीने उपचार केल्यानंतर सकाळच्या सुमारास सुधारणा झाल्याचे समजते.

गावित यांच्यावर उपचार सुरू असल्याचे वृत्त साेशल मीडियावर पसरल्यानंतर भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गर्दी केली हाेती. त्यांच्यासमवेत खासदार हीना गावित व कुटुंबीय दाखल झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...