आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी राष्ट्रपतींनीही केले ‘तिचे’ कौतुक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कामाच्या घाईत अचानक कागदपत्रे स्टेपल करतांना स्टेपलरमधील पिना संपल्याचे लक्षात येते आणि पिनांची शोधाशोध सुरू होते. यावर उपाय म्हणून अंकिता नगरकर या बालवैज्ञानिकाने शोधलेला उपाय निश्चितच सर्वांसाठी उपयुक्त ठरू शकतो. कागदपत्र स्टेपल करतांना अंकिताला ही कल्पना सुचली. गाडी मागे घेतांना जसा रिव्हर्स इंडिकेटर्स असतो तसा या ठिकाणीही वापरता येईल असे तिला वाटले. स्टेपलरच्या पिना संपल्याचे लक्षात येण्यासाठी तिने प्रथम काही पिनांना नेलपेंट लावून पाहिले. मात्र, नेलपेंटच्या जाड थरामुळे प्रयोग अयशस्वी झाला. त्यानंतर तिने मार्करचा वापर केला, त्यात ती यशस्वी झाली.


काहीही अशक्य नाही
माझ्या संशोधनाची राष्‍ट्रीय पातळीवर दखल घेतली जाईल याची मला कल्पनाही नव्हती. कोणतीही गोष्ट अशक्य नाही, याचा प्रत्यय आला. तुझा प्रकल्प अतिशय सोपा आहे मात्र तो अन्य कोणाआधी तुला सुचला हेच तुझे वेगळेपण आहे अशा शब्दात माजी राष्‍ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी दिलेली शाबासकी महत्वाची वाटते.
अंकिता नगरकर, बालवैज्ञानिक