आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेवारस बॅगमुळे घबराट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पंजाबमध्ये अतिरेकी हल्ला झाल्यानंतर देशभरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात अाला असतानाच, साेमवारी नाशिक शहरातील महात्मा गांधी राेड, रेडक्राॅस सिग्नल परिसर जिल्हा शासकीय रुग्णालयात बेवारस बॅग अाढळल्यानंतर परिसरात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरल्याने नागरिकांंमध्ये घबराट पसरली होती. दरम्यान, तासभरानंतर या बॅगेत बाॅम्ब नसल्याचे बॉम्बशोध पथकाकडून सांगण्यात आले.
महात्मा गांधी राेड रेडक्रॉस सिग्नल येथे दुपारी वाजेच्या सुमारास दोन बेवारस बॅग संशयास्पदरीत्या अाढळल्यानंतर शहरात बॉम्ब अाढळल्याची अफवा पसरली. घटनेची माहिती मिळताच बॉम्बशाेध पथक घटनास्थळावर दाखल झाले.या बॅगची तपासणी होत असतानाच जिल्हा रुग्णालयातही संशयास्पद बॅग सापडल्याची माहिती पुढे आली. एकामागे एक तीन बॅग सापडल्यानंतर शहरात बॉम्ब सापडल्याची अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. या बॅगेत इलेक्ट्राॅनिक वस्तू गवंडी कामांचे साहित्य आढळल्याची माहिती पथकाकडून देण्यात आली. यावेळी नाशकात सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर दौऱ्यावर अालेले पोलिस महासंचालक त्यांच्यासमवेत असलेला विशेष पोलिस बंदोबस्त शहरातील मुख्य परिसरात तैनात करून ठिकठिकाणी संशयास्पद वस्तूंची तपासणी करण्यात आली. दरम्यान, जिल्हा रुग्णालयासह बसस्थानकांचीही पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. तर, साधुग्राम परिसरात कडक पोलिस बंदाेबस्त ठेवण्यात अाला अाहे.

देशात दहशतवादी शक्तींनी पुन्हा वर काढलेले डाेके, त्यातून िनर्माण हाेणारा सामाजिक तणाव अाणि अागामी कुंभमेळा लक्षात घेता साेशल मीडियाचा उपयाेग करताना संयम बाळगण्याची गरज अाहे. सहजगत्या पसरवल्या जाणाऱ्या अशा गाेष्टींचा फार माेठा समाजविघातक परिणाम हाेऊ शकताे. काेणत्याही घटनेची खातरजमा करूनच माहितीचे वहन व्हावे अाणि त्यातूनही सनसनाटी िनर्माण करण्यापेक्षा तणाव िनवळण्यासाठी प्रयत्न करावेत. काेणी खाेडसाळपणा करीत असेल तर सुजाण नागरिकांनी त्याचीच री अाेढता त्याच्यावर िनयंत्रण अाणून अन्य लाेकांनाही सावध करावे. प्रचंड ताकद असलेल्या या माध्यमाचा विधायक उपयाेग करावा, असे अावाहन ‘दिव्य मराठी’ करीत अाहे.

अरे हे ‘मॉकड्रिल’ नाही
एम.जी. रोड, रेडक्रॉस सिग्नल येथे दुपारी वाजेच्या सुमारास दोन संशयास्पद बॅग सापडल्यानंतर बॉम्ब सापडल्याची अफवा पसरली. तर, घटनास्थळावर पोलिसांना पाहून हे मॉकड्रिल असल्याचे काही पोलिसांकडून सांगण्यात येत होते. मात्र, एका पोलिस कर्मचाऱ्याने हळूच सांगितले की ‘अरे हे मॉकड्रिल नाही’.

बेवारस बॅग धुळ्यातील युवकाची
अमेरिकेतूनअालेल्या राेनित नारायण गलानी या धुळ्यातील िवद्यार्थ्याची ही बॅग असल्याचे निष्पन्न झाल्याचे पाेलिसांनी सांगितले. राेनित वडिलांसह धुळ्याला जाण्यासाठी निघाला असता नाशिकमध्ये थांबला हाेता. शाॅपिंगसाठी ते गेले असता कारचालकाला झाेप लागली. यादरम्यान चाेरट्यांनी राेनितची बॅग लांबवली लॅपटाॅप चाेरून बॅग साेडून िदली. इलेक्ट्राॅनिक माध्यमांनी याबाबत विपर्यस्त वृत्त दिल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. त्यामुळे नागरिकांनी खातरजमा करून दिलेल्या वृत्तावरच विश्वास ठेवावा, असे अावाहन पाेलिसांनी केले अाहे.

जिल्हा रुग्णालयात अाढळलेल्या बॅगमध्ये कपडे अाढळले.
महात्मा गांधी राेडवरील बेवारस बॅगची तपासणी करताना पाेलिस.
जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी अाणलेला पाेलिस श्वान.