आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेवारस बॅग अाढळल्याने द्वारका चाैफुलीवर घबराट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- साेमवारीदुपारी १२.४५ वाजेच्या दरम्यान द्वारका परिसरात भुयारी मार्गाजवळ एका दुचाकीवर बेवारस बॅग ठेवल्याचे परिसरातील व्यावसायिक कैलास तांबे यांना आढळले. यामुळे परिसरात घबराट पसरली. ही बाब त्यांनी पाेलिसांना कळवताच पाेलिस पथक याठिकाणी तत्काळ पाेहाेचले. परंतु, पाेलिसांनी कळविल्यानंतरही बाॅम्बशाेध पथक दीड तासाने पाेहाेचले. त्यानंतर या पथकाने तपासणी केली असता या बॅगमध्ये कागदपत्रे अाढळल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास साेडला.

दुचाकीवर ठेवण्यात अालेली बॅग कोणाची असल्याचे माहिती नसल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात हाेते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर काही मिनिटांत भद्रकाली पोलिस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. घटनेचे गांभीर्य अाेळखून पोलिसांनी बॉम्बशोध पथकालाही ही बाब कळवली. परंतु, तब्बल दीड तास उशिरा बॉम्बशोध पथक या ठिकाणी दाखल झाले. बेवारस बॅगची तपासणी या पथकाने केली असता त्यात कागदपत्रे आढळल्याने सर्वांनी सुुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, या घटनेत सुरक्षेची जबाबदारी असलेल्या बॉम्बशोध पथकाचा हलगर्जीपणा उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली अाहे.
द्वारका चाैफुली परिसरात दुचाकीवर बेवारस बॅग अाढळल्यानंतर एक ते दीड तास उलटूनही घटनास्थळी बॉम्बशोध पथक आल्याने उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. द्वारका परिसरात बेवारस बॅग आढळून आल्याची माहिती कळताच नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. शहराला जोडणाऱ्या मुख्य आणि वाहतुकीच्या रस्त्यावरच हा प्रकार घडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षेबद्दल उपाययोजना केल्या जात असतानाच बॉम्बशोध पथकाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. यावेळी सहायक आयुक्त विजय चव्हाण, भद्रकाली पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक अादी उपस्थित होते.

बॅग गेली होती चोरीला
नाशिकरोडपरिसरातील बांधकाम व्यावसायिक ठेकेदार किरण वाघ यांची बॅग दोन दिवसांपूर्वी नाशिकरोड येथून चोरीला गेली होती. तीच बॅग कागदपत्रांसह सुव्यवस्थितरीत्या द्वारका परिसरात सापडली. ही बॅग तपासणी झाल्यानंतर वाघ यांना परत करण्यात अाली.
पाेलिस पथक तत्काळ दाखल
द्वारकापरिसरात एका दुचाकीला बॅग अडकवल्याचे दिसून आल्यानंतर त्याची माहिती भद्रकाली पोलिस ठाण्यात दिली. पोलिस तत्काळ आले. मात्र, बॉम्बशोध पथक दीड तासानंतर घटनास्थळी अाले. कैलासतांबे, प्रत्यक्षदर्शी+