आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अघोरी विद्येच्या कृत्यातील चौघांना चार दिवस कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - देवळालीगावातील राजवाडा येथे उघडकीस आलेल्या अघोरी कृत्यातील चौघा संशयितांना शुक्रवारी न्यायालयाने 10 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

वडिलांच्या आजारावर उपचारासाठी अमावास्येच्या रात्री अघोरी कृत्याचा प्रकार शेजारी गुरुवारी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी जादूटोणा विरोधी अध्यादेशानुसार जितेश मोगल भालेराव, विजय मोगल भालेराव, संगीता मोगल भालेराव व सुनीता पाल यांना अटक करून न्यायालयात उभे केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मोगल भालेराव यांच्या घरात त्यांच्या दम्याच्या आजारावर उपचारासाठी खड्डा खोदून पूजा सुरू होती. वडील कायम आजारी असल्याने अमावास्येच्या रात्री पूजा केल्याने काळूबाई प्रसन्न होऊन ते बरे होतील, या अंधर्शद्धेपोटी अघोरी कृत्याचा हा प्रकार घडल्याचा अंदाज पोलिस व्यक्त करत आहेत. अधिक तपास सहायक निरीक्षक अरविंद महर्षी व त्यांचे सहकारी करीत आहेत.