आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वीस हजारांची लाच घेताना चाैघे अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव - मालमत्तेवर वारसदाराचे कायदेशीर नाव लावण्यासाठी अर्जदाराकडून २० हजारांची लाच घेताना नगररचना भूमापनच्या अधिकाऱ्यांसह चाैघांना अटक करण्यात अाली.

तक्रारदार व्यक्तीच्या काकाला दाेन पत्नी हाेत्या. त्यांच्या त्यांच्या मृत्युनंतर तक्रारदाराला मालेगाव येथील सर्व्हे नं. ९९ व १०२ या मिळकतीवर काकाच्या पहिल्या पत्नीचे वारसदार म्हणून लावायचे हाेते. त्यासाठी त्यांनी दाभाडी येथील नगररचना भूमापन कार्यालयात अर्ज केला हाेता. मात्र कर्मचाऱ्यांनी या कामासाठी ४० हजार रुपयांची लाच मागितली हाेती. काम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी तक्रारदाराने यापूर्वी २० हजार रुपये लाचेचा पहिला हप्ता दिलाही हाेता. दरम्यानच्या काळात त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी, त्यानुसार सापळा रचण्यात अाला. मंगळवारी दुसऱ्या टप्प्यातील २० हजार रुपये देताना पथकाने नगररचना विभाागच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले. भूमापन अधिकारी शांताराम सुखदेव अहिरे, देखभाल दुरुस्ती सर्व्हेअर अानंद रामसिंग त्रिमाळे, शिपाई विनायक दादाजी गांगुर्डे व त्यांच्यासाठी मध्यस्थी करणारा सुभाष नारायण शिराेळे (रा. रावळगाव) यांना अटक केली.
बातम्या आणखी आहेत...