आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात एकाच कुटुंबातील चौघांना डेंग्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- कॉलेजरोडवरील डिसूझा कॉलनी येथे एकाच कुटुंबातील चौघांना डेंग्यू झाला आहे. परिसरात अस्वच्छता असल्याने साथीचे रोग पसरत आहेत.

डिसूझा कॉलनीतील हिरालाल चौधरी (वय 70), राजशेखर चौधरी (40), रोहित चौधरी (11) व तेजस चौधरी (10) यांना चार दिवसांपूर्वी थंडी-ताप आला. चौघांनाही डेंग्यू झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील हिरालाल यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान, रंजन ठाकरे यांनी संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधत पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. तर राजशेखर चौधरी यांनी, परिसरातील हॉटेलमुळे होणार्‍या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार वाढत असल्याचे सांगितले.