आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरच्या चार विद्यार्थिनींना विषबाधा; जिल्हा रुग्णालयात दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - व्होकेशनलट्रेनिंग सेंटरच्या चार विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. सेंटरच्या व्यवस्थापनाने चौैघींना अत्यवस्थ अवस्थेमध्ये जिल्हा रुग्णालयात दाखल केले. थोडा जरी उशीर झाला असता तरी मुलींच्या जिवावर बेतले असते. पंचवटी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

हिरावाडीरोड येथील दि. लेप्रसी मिशनच्या व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरमध्ये हा प्रकार घडला. शुभांगी कोटमकर (२३), माया चक्रे (१९), स्वाती रामटेके (१९) अरिफा काद्री (२१) यांनी रात्रीचे जेवण घेतले. सकाळी उठल्यानंतर त्यांना अत्यवस्थ वाटू लागले. मळमळ अाणि उलट्या झाल्या. दोन मुली चक्कर येऊन पडल्या. सेंटरच्या व्यवस्थापकाने तत्काळ त्यांना वाहनातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला. अन्नातून विषबाधा झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...