आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाथर्डीमधून चार वर्षांच्या बालिकेचे अपहरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदिरानगर- विनयभंग, महिला अत्याचाराच्या घटनांचे सत्र सुरू असतानाच पाथर्डी परिसरातून एका चार वर्षीय बालिकेचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात सातपूरच्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातपूर येथील निगळ मळ्याजवळ डामसे कुटुंबीय राहत होते. त्यांच्या शेजारी पप्पू जनकसिंग हा डामसे कुटुंबीयांना वारंवार त्रास व धमकी देत होता. त्याच्या जाचाला कंटाळून दोन आठवड्यांपूर्वीच डामसे कुटुंबीय पाथर्डी परिसरात राहण्यासाठी आले होते.

शुक्रवारी रात्री 7 वाजेच्या सुमारास डामसे या चार वर्षीय मुलीसह पाथर्डी फाटा परिसरातून जात असतानाच संशयित पप्पूसिंग याने रस्त्यात दुचाकी उभी करून वाद घातला. त्यातूनच डामसे यांच्या हातातील मुलीस जबरदस्तीने उचलून नेऊन पळून गेल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपहृत मुलगी व संशयिताच्या शोधासाठी पोलिसांचे स्वतंत्र तीन पथके नियुक्त करण्यात आली आहेत.