आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिसांच्या कृपादृष्टीने अद्यापही फसव्या याेजना ठरताहेत ‘लकी’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - केबीसी,इमू यांसारख्या गुंतवणूक योजनांतून किमान हजार कोटींचा गुंतवणूकदारांना गंडा घालण्याचा प्रकार ताजाच असताना त्याच प्रकारच्या वेगवेगळ्या कंपन्या नाव बदलवून अल्पावधीतच दामदुपटीच्या योजनांद्वारे नागरिकांची फसवणूक करीत असल्याचे प्रकार पुन्हा बळावू लागले अाहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरातील देवळाली कॅम्प, सिडको, सातपूर, जुने नाशिक यांसह विविध ठिकाणी वेगवेगळ्या आर्थिक प्रलोभनांद्वारे ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या कंपन्या वाढल्या असून, त्यांच्याकडून लाखोंची बक्षिसे मिळवून देण्याचा दावा केला जाताे. स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर जाहिराती करून नागरिकांना योजनेत पैसे गुंतवण्याचे आवाहन कंपन्यांकडून केले जाते. विशेष म्हणजे, पैसे गुंतवल्यावर फ्लॅट, कार, दुचाकी यांसह लाखो रुपयांची अाकर्षक बक्षिसेही मिळतील, असे या कंपन्यांकडून सांगण्यात येत असल्याने अनेक नागरिक त्याला सहजपणे भुलतात. मात्र, आतापर्यंत हजारो नागरिकांनी विविध योजनांत लाखाे रुपये गुंतवले असून, अनेकांची फसवणूकच झाली अाहे. काहींचे माेठ्या प्रमाणावर पैसे जाऊन ताेकडे गिफ्ट‌्स त्यांच्या हातात थाेपवण्यात अाल्याचेही प्रकार अाहेत. संबंधित प्रकाराकडे पाेलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली अाहे.
असेफ सते सावज जाळ्यात...
फ्लॅट,कार, दुचाकी, फ्रीज, अाेवन यांसह विविध लाखो रुपयांच्या वस्तूंचे अामिष दाखवून नागरिकांकडून पाच हजारांपासून पंधरा हजार रुपयांपर्यंत पैसे उकळले जातात. पैसे घेतल्यानंतर संबंधितांना एक पावती दिली जाते. त्या पावतीवर असलेल्या नंबरची सोडत दर पंधरा दिवसांनी केली जाते अन् कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अनेक बक्षिसेही लागल्याचे दाखवले जाते. ते पाहून इतर नागरिकांनाही या ‘लकी ड्रॉ’मध्ये सहभागी हाेण्याची इच्छा होते अाणि अापाेअापच सावज कंपन्यांच्या जाळ्यात फसते.

नावबदलून केली जाते फसवणूक
माेठमाेठ्या कंन्यांकडून फसवणुकीचे प्रकार ताजेच असताना अाता नाव बदलून अल्पावधीतच दामदुपटीच्या योजना आणणाऱ्या कंपन्याही पुन्हा शहरात उतरल्या आहेत. अाजघडीला विविध नावांनी अशा प्रकारच्या कंपन्या सुरू असून, नागरिकांना अामिष दाखवून कंपन्यांकडून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

या योजनांचे दाखवतात अामिष
फसव्या,आकर्षक, जास्त व्याजदराच्या योजना, कमी कालावधीत दामदुप्पट रक्कम देणाऱ्या योजना, शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकी, साखळी पद्धतीने रक्कम जमा करून लकी ड्रॉच्या योजना राबविणे, खासगी कंपन्या, संस्था यांच्यामार्फत चालविण्यात येणाऱ्या फसव्या पिग्मी योजना, फिक्स डिपॉझिट स्किम यांसह विविध फसव्या योजना सध्या शहरात सुरू असल्याचे ‘डी.बी. स्टार’च्या पाहणीत समाेर अाले अाहे.

नाेंदणीसाठी स्पर्धाच सुरू
शहरात विविध नावाने धर्मादाय अायुक्तांकडे नाेंदणी करून याेजना सुरू करण्याची स्पर्धाच सुरू झाली अाहे. ते १० जण एकत्र येऊन ही याेजना सुुरू करतात अन् हजाराे सभासद गाेळा करण्यासाठी एजंटची नेमणूकदेखील केली जाते. त्यानंतर नागरिकांकडून ५००, ६००, ७०० रुपयांची रक्कम टप्प्याटप्प्याने घेतली जाते. या माेबदल्यात त्यांना फ्लॅट, चारचाकी, तीनचाकी दुचाकी वाहनांसह साेन्याचे नेकलेस, एलसीडी, फ्रीज यांसारख्या गृहाेपयाेगी वस्तूंचे अामिष दाखवून फसवणूक केली जाते.

पोलिसांनी कडक कारवाई करावी
^खोट्या स्किम काढून, नागरिकांना लाखो रुपयांची अामिषे दाखवून फसवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून माेठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या कंपन्यांविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलण्याची गरज आहे. जेणेकरून नागरिकांच्या फसवणुकीचे प्रकार कमी हाेण्यास मदत हाेईल. - अतुल धाेंगडे, नाशिकराेड

नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे
^शहरात काही वर्षांपासून पैसे गुंतवणूक करून अल्पावधीत ते दुप्पट करून देण्याचे मोठ-मोठ्या लकी ड्रॉचे अामिष दाखवून फसवणुकीच्या घटना वाढतच आहेत. केबीसी घोटाळ्यामुळे संपूर्ण राज्यातील नागरिकांची फसवणूक झाल्याचे समोर आले होते. अशा फसव्या कंपन्यांपासून अाता नागरिकांनीच सावध राहणे गरजेचे आहे. - सागर बेदरकर श्रीकांत धिवरे, पाेलिसउपायुक्त
या कंपन्यां विरोधात तक्रार...
गेल्याकाही दिवसांपासून शहरातील इंदिरानगर, उपनगर, सातपूर, पंचवटी, नाशिकरोड, देवळाली कॅम्प परिसरात अनेक नागरिकांनी काही फसव्या कंपन्यांद्वारे फसवणूक झाल्याच्या तक्रारी नाेंदवल्या आहेत. यात भाग्यरत्न स्किम, स्वप्न साकार स्किम, तसेच भाग्यलक्ष्मी स्किम यांच्याविरोधात देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात, तर साई सेवा स्किम या कंपनीिवराेधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात अाली.

तरी फसवणुकीचे वाढले प्रमाण
दामदुप्पटरकमेचे अामिष दाखवून यापूर्वीच शहरातील अनेक गुंतवणूकदारांची कराेडाे रुपयांची फसवणूक झाली अाहे. हे प्रकार राेखण्यासाठी शासनाने राज्यातील प्रत्येक पाेलिस ठाण्यात अार्थिक गुन्हे कक्षाची निर्मिती केलीे. टीव्ही, वर्तमानपत्रे, भित्तिपत्रे अथवा ताेंडी जाहिरातीद्वारे नागरिकांना अामिष दाखविणाऱ्यांची गुप्त माहिती मिळवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे अादेश अाहेत. तसेच जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी पाेलिस अायुक्त अधीक्षकांना अशी माहिती कळविणे बंधनकारक अाहे. तरीही फसवणुकीचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही.

लकी ड्रॉच्या नावे हजाराेंची फसवणूक
संबंधित लकी ड्रॉ कंपनीच्या माध्यमातून काढण्यात येणाऱ्या ड्रॉमध्येही मोठ्या प्रमाणावर नागरिकांची फसवणूक केली जाते. अनेक कंपन्यांकडून लकी ड्रॉ काढताना आपल्या संपर्कातील ग्राहकांचेच नंबर कसे काढता येईल, याचा विचार करून ड्रॉ तयार केले जातात. इतर नागरिकांना मात्र पाच ते दहा हजार भरून फक्त दोनशे ते पाचशे रुपयांपर्यंतच्या वस्तूंचाच लकी ड्रॉ लागतो. वारंवार असे प्रकार घडूनही नागरिकांना शहाणपण येत नाही, हे विशेष.

पोलिसांकडून जनजागृतीचा अभाव
फसव्या गुंतवणूक योजनांचे राज्यातील वाढते पीक बघता याबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी गुंतवणूक आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांची या मोहिमेकरिता मदत घेतली जाणार होती. या मोहिमेत टी.व्ही., केबल यांसारख्या माध्यमातून घराघरांपर्यंत ही जनजागृती केली जाणार हाेती. मात्र, पोलिसांनाच या मोहिमेचा विसर पडला आहे. परिणामी, जनजागृतीच्या अभावामुळे नागरिकांच्या फसवणुकीचे प्रमाण वाढले अाहे.

एकच नंबरच्या अनेक पावत्या
लकी ड्रॉ स्किमचालकांकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या पावत्यांवर लकी ड्रॉ क्रमांक लिहिलेला असतो. लकी ड्रॉची साेडत झाल्यावर पावतीचा नंबर पाहून नागरिकांना बक्षिसे दिली जातात. मात्र, मोठी बक्षिसे लागल्यावर एकाच नंबरच्या दोन ते तीन पावत्या अाढळतात आणि संबंधितांना त्यांच्याजवळील पावती खोटी असल्याचे सांगण्यात येते. अशा प्रकारांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढू लागले असून, याबाबत देवळाली कॅम्प तसेच, सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणूक झालेल्या नागरिकांनी तक्रारीदेखील दिल्या असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समाेर अाले अाहे.

देवळाली कॅम्पला गुन्हा दाखल
दामदुपटीचेअामिष दाखवून शेकडाे गुंतवणूकदारांना कराेडाे रुपयांचा गंडा घालणाऱ्या के.बी.सी. इमूसारख्या प्रकरणांनंतर अाता फ्लॅट, वाहने, दागिने, एलसीडी अशा विविध वस्तूंचे अामिष दाखवून पैसे उकळणाऱ्या याेजनांचा शहरात सुळसुळाट झाला अाहे. विशेष म्हणजे, या याेजनांमध्ये नागरिकांची फसवणूक हाेण्यापूर्वीच पाेलिसांनी या याेजनांच्या संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली. परिमंडळ दाेनचे उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्या अादेशान्वये देवळाली कॅम्प पाेलिस ठाण्यात चार लकी ड्रॉ कंपन्यांच्या संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात अाले अाहेत.
...तर कडक कारवाई करणार
पैसे दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून, खोट्या स्किम काढून, इतरांपेक्षा जास्त व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांच्या फसवणुकीचे प्रकार शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढत असून, अाता ‘लकी ड्रॉ’च्या नावाखाली हाेणाऱ्या फसवणुकीमुळेदेखील पाेलिसांपुढे अाव्हान उभे ठाकले अाहे. फ्लॅट, कार, दुचाकी यांसह लाखो रुपयांच्या विविध अाकर्षक बक्षिसांची अामिषे दाखवून हाेणाऱ्या या फसवणुकीस पाेलिस प्रशासनाबराेबरच नागरिकांचा निष्काळजीपणाही तितकाच कारणीभूत ठरत असल्याचेही दिसून येते. याबाबत फसवणूक झालेल्या नागरिकांनी केलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ‘डी. बी. स्टार’ने केलेल्या पाहणीत कंपन्यांकडून एकाच नावाच्या दाेन पावत्या देणे, नावांत बदल करणे यांसह साखळी पद्धतीने पैसे उकळणे अादी प्रकार घडत असल्याचे दिसून अाले अाहे. त्यावर ‘डी. बी. स्टार’चा हा प्रकाशझाेत...
{शहरात लकी ड्राॅद्वारे हाेणाऱ्या फसवणुकींत माेठी वाढ
{अनेक पाेलिस ठाण्यांत तक्रारी दाखल, कारवाईचा मात्र अभावच
{गेल्या काहीदिवसांपासून शहरात काही लकी ड्रॉच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या कंपन्या सुरू झाल्या आहेत. त्यांना काेणाची परवानगी असते?
-अशा कंपन्या काेणाचीही परवानगी घेत नसतात, नागरिकांनीच सतर्क राहणे अत्यंत गरजेचे अाहे.
{अशा फसव्याकंपन्यांकडून नागरिकांची अार्थिक फसवणूक झाल्यास त्याला जबाबदार कोण राहील?
-नागरिकांचा निष्काळजीपणाच त्याला जबाबदार ठरेल.
{गुन्हे दाखलझालेल्या कंपन्यांवर काय कारवाई करणार? कंपन्यांची चाैकशी केली जाते का?
-अशा कंपन्यांवर फसवणूक हाेण्यापूर्वीच कारवाई केली अाहे. शासनाच्या परिपत्रकानुसार अशा फसव्या कंपन्यांवर कडक कारवाई केली जाते. जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडूनही माहिती मिळाल्यास कारवाई करताे. यापुढेही अशा तक्रार दाखल झालेल्या कंपन्यांवर कडक कारवाई करणार.