आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्यापेक्षा महाग धातूचे आमिष दाखवत पाऊण कोटीला गंडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - उपग्रहाच्या यंत्रणेत वापरला जाणारा आणि सोन्यापेक्षाही महाग अशा धातूमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवत सात ठगांनी एका व्यावसायिकास सुमारे पाऊण कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार जयभवानी रोड परिसरात उघडकीस आला. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात संशयितांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती बलराजसिंग अरुणसिंग (रा. पवननगर, जयभवानी रोड) यांच्या फिर्यादीनुसार संशयित दीपक तिवारी, नरेश गांधी, सुभाष गुप्ता, पाठक, माथुर, छगन कापरे, गनंश इथापेतपेश्वर यांनी उपग्रहामध्ये वापरला जाणारा पिवळ्या रंगाचा सोन्यापेक्षाही महाग असा धातू देण्याच्या बदल्यात ही रक्कम ते १६ ऑगस्ट २०१५ दरम्यान उकळली. आंतरराष्ट्रीय बाजारात या धातूला मोठी मागणी असल्याचे आमिष या ठगांनी दाखविले. हा धातू देण्याच्या बदल्यात वेळोवेळी पैसे घेत ७५ लाख रुपयांची रक्कम उकळली. यानंतर हा धातू देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बलबिरसिंग यांनी उपनगर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.