आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परदेशात नाेकरी देण्याचे अामिष, सात लाखांना गंडा, एका घटनेत वृद्धाची, तर दुसरीत युवतीची फसवणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मुलास परदेशात नोकरी देण्याचे अामिष देत एका वृद्धाची सुमारे सात लाखांची, तर सिंगापूर येथे जाण्यासाठी एअरतिकीट आणि डॉलर देण्याचे अामिष देत युवतीला साडेतीन लाखांना गंडा घातल्याचा प्रकार अंबड आणि नाशिकरोड येथे उघडकीस आला. या प्रकरणी संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात अाला आहे.
या प्रकरणी बिडेरंजन प्रसाद निरंजन (रा. जऊळके वणी) यांनी पाेलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित महेंद्र किसनलाल महेश, सुयोज नंदा घोष, नंदा दुलाल शेख (रा. कोलकाता, हल्ली त्रिमूर्ती चौक, सिडको) यांनी हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेल्या निरंजन यांच्या मुलास सिंगापूर येथील हॉटेल सहायक व्यवस्थापकाची नोकरी लावून देण्याचे अामिष दाखवत त्यांच्याकडून वेळोवेळी लाख ८५ हजारांची रक्कम घेतली. यानंतर नोकरीबाबत विचारणा केली असता संशयितांनी त्याबाबत नकार दिला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयितांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

सिंगापूर प्रवासाचे अामिष : दुसऱ्याघटनेत सिंगापूर प्रवेशाचे अामिष दाखवत एका महिलेला साडेतीन लाख रुपयांना गंडा घालण्यात अाला. याप्रकरणी जेलरोड येथील शिल्पा साळवे यांनी उपनगर पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीत त्यांनी म्हटले की, संशयित मयूर टोकवानी, रोशन कोटवानीस, पंकज वर्मा यांनी सिंगापूर येथे जाण्यासाठी एअरतिकीट आणि डॉलर देण्याच्या बदल्यात लाख ५८ हजार रुपयांची रक्कम घेत पोबारा केला. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात संशयितांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...