आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वेगवेगळ्या घटनांत ४३ लाखांची फसवणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात फसवणुकीचे सत्र सुरूच असून, बोगस कागदपत्रांच्या अाधारे एका महिलेचा प्लाॅट विक्री करून २० लाखांची फसवणूक झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस अाली. याच घटनेबराेबर थेट कंपनीतून नवीन वाहन काढून देण्याचे अामिष देत १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकारही उघडकीस आला अाहे. या प्रकरणी आडगाव, सरकारवाडा पोलिस ठाण्यांत फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गीता खोब्रागडे (रा. दुर्गानगर) यांनी आडगाव पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार जुलै २०१२ या दरम्यान संशयितांनी बोगस मतदान कार्डवर एका महिलेचा फोटो लावत ती खोब्रागडे असल्याचे भासवत बोगस कागदपत्रांच्या अाधारे खरेदीखत नोंदवत नांदूर शिवारातील प्लाॅट विक्री केला. शशिकांत परदेशी (रा. देवळाली गाव), संजय काशीनाथ साळुंके (रा. स्नेहनगर) पवन जाधव (रा. बोरगड) हे संशयित असून, त्यांनी एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकास प्लाॅट विक्री केला. त्यांनी हा प्लाॅट तिसऱ्याला विक्री करत असे चार ते पाच खरेदीखत करून मूळ मालकाची सुमारे २० लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात संशयितांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक माळी तपास करीत आहेत.
सरकारवाडा पोलिसांनी दिलेली माहिती आणि अमजत नन्हेसाब नुरबाश (रा. त्रिमूर्ती चौक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित चिन्मय उमाकांत खरोटे (रा. बडदेनगर) याने एक वर्षापूर्वी संपर्क साधून महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या एक्सव्हीयू आणि स्काॅर्पिओ या प्रदर्शनासाठी ठेवलेली वाहन कमी किमतीत काढून देण्याचे अामिष देत थेट कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या नावाखाली वेळोवेळी १३ लाख रक्कम रोख आणि चेक स्वरूपात घेतली. मात्र, एक वर्षापासून वाहन मिळत नसल्याने नुरबाश यांनी अखेर सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनुसार पोलिसांत संशयिताच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक संदीप कांबळे पुढील तपास करत आहेत. दोन्ही गुन्ह्यांत सुमारे ४३ लाखांचा गंडा संशयितांनी घातला अाहे.
बातम्या आणखी आहेत...