Home »Maharashtra »North Maharashtra »Nashik» Fraud Corporaters Of Municipal Councils Will Not Get The Posts

पालिका निवडणुकीतील गद्दारांना मिळणार नाहीत पदे; अजय चाैधरी यांची स्पष्टाेक्ती

महापालिका निवडणुकीत गद्दारी करुनही काेणी अाता पदाची अपेक्षा करीत असेल तर त्याचा भ्रमनिरास हाेणार अाहे. कारण माझ्या संपर्

प्रतिनिधी | Jul 30, 2017, 09:07 AM IST

  • पालिका निवडणुकीतील गद्दारांना मिळणार नाहीत पदे; अजय चाैधरी यांची स्पष्टाेक्ती
नाशिक-महापालिका निवडणुकीत गद्दारी करुनही काेणी अाता पदाची अपेक्षा करीत असेल तर त्याचा भ्रमनिरास हाेणार अाहे. कारण माझ्या संपर्कप्रमुख पदाच्या कारकिर्दीत तरी एकाही गद्दाराला पक्षाचे पद देणार नाही, अशी स्पष्टाेक्ती शिवसेनेचे संपर्क प्रमुख अजय चाैधरी यांनी केली. शहर अाणि जिल्हा कार्यकारिणीत बदल करण्याची जबाबदारी महानगरप्रमुख अाणि जिल्हा प्रमुखांवर साेपवित चमकाेगिरी करणाऱ्यांना दूर ठेवून प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना संधी देण्याचे त्यांनी अादेशित केले. शिवसेनेच्या नगरसेवकांच्या मेळाव्यात ते बाेलत हाेते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त होत असलेल्या शिवसंपर्क अभियानांतर्गत शनिवारी (दि. २९) अजय चौधरी यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महापालिकेत झालेल्या मेळाव्यात बाेलताना ते म्हणाले की, महापालिकेच्या निवडणुकीत अतिशय चांगले वातावरण असताना काहींनी गद्दारी करीत अापली वृत्ती दाखवून दिली. त्यामुळे अशा गद्दारांना यापुढे अजिबातच स्थान दिले जाणार नाही. जिल्हा अाणि महानगराची अंतर्गत कार्यकारिणीत बदल करण्याची गरज अाहे. यासाठी महानगरप्रमुख अाणि जिल्हाप्रमुखांनी शिवसंपर्क अभियानांतर्गत संपूर्ण शहर चाळून मारत जी केवळ चमकाेगिरी करणारी मंडळी अाहे त्यांना बाजूला काढावे. तसेच प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार पदे द्यावीत असेही त्यांनी सूचित केले.

विविधकार्यक्रम : प्रभाग२५ मध्ये जुन्या मटाले मंगल कार्यालय येथे वृक्षारोपणाने अभियानाला सुरवात झाली. त्यानंतर इंस्पालीयर स्कूल, त्रिमूर्तीचौक येथे शाडू मातीपासून श्रीगणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा झाली. नगरसेविका सत्यभामाताई गाडेकर यांच्या प्रभागात वालदेवी किनारी वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. तसेच, महिलांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण वर्गाची सुरवात, मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण वर्गाची सुरवात महिलांसाठी पर्सनल मेकअप, साडी ड्रायपिंग, विविध हेअरस्टाईल प्रशिक्षण वर्गांचा शुभारंभ करण्यात आला.

टाऊन हॉल येथे विभाग प्रमुख विकास गीते यांच्या वतीने पालिका शाळांमधील ३०० विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात अाले. उपमहानगर प्रमुख दिगंबर मोगरे यांच्या पंचवटी परिसरातील प्रभाग क्रमांक मधील अमृतधाम कोणार्कनगर येथे शिवसेना शाखांचे उद्घाटन चौधरींच्या हस्ते झाले. या प्रसंगी उपनेते बबन घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख तथा विरोधीपक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, राजू आण्णा लवटे, शिवाजी सहाणे, दत्ता गायकवाड, नगरसेवक शाम साबळे, प्रवीण तिदमे, आर. डी. धोंगडे, सुर्यकांत लवटे, संतोष गायकवाड, प्रशांत दिवे, चंद्रकांत खोडे आदी उपस्थित होते.

अात्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी नगरसेवकांनी दिला महिन्याचा निधी
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी शिवसेना नगरसेवकांच्या वतीने एक महिन्याचे मानधन देण्यात अाले. हा दोन लाख ६२ हजार ५०० रुपयांचा निधी संपर्कप्रमुखांकडे सुपूर्द करण्यात अाला.

Next Article

Recommended