आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रेडिट कार्डद्वारे लाखाला गंडा; मोबाइल विक्रेत्यास फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- उंटवाडीरोड भागातील सेल्युलर केअर सेंटर दुकानात मोबाइल खरेदीस आलेल्या ग्राहकाने बनावट नाव धारण करून क्रेडिट कार्डद्वारे एक लाख 19 हजारांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्वास मूर्ती यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या दुकानात येऊन संशयिताने र्शीकांत पाटील नावाची व्यक्ती असल्याचे भासवित कार्ड स्वॅप करून प्रत्येकी 30 ते 40 हजार रुपये किमतीचे चार मोबाइल खरेदी केले. ग्राहकाने क्रेडिट कार्ड क्रमांकात फेरफार करून दुसर्‍याच्या नावावर कार्ड स्वॅप केल्याचे उघडकीस आले असून, दुकानदाराच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. दरम्यान, महिनाभरात अशा चार ते पाच घटना घडल्या असून, एकही गुन्हा उघडकीस न आल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.