आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लघु व्यवसायासाठी कर्जाच्या नावाखाली 18 लाखांना गंडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको- लघु व्यवसायासाठी सुमारे 50 लाखांपर्यंतचे कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवून त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून त्या मोबदल्यात जवळपास 18 लाख रुपये उकळून गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. 18 तारखेपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

यासंदर्भात फिर्यादी अक्षय अविनाश क्षीरसागर (वय 21, रा. बेळे कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार हा प्रकार समोर आला आहे. पाथर्डी फाटा येथील कमलेशलाल मेलवाणी यांनी आपल्याला अँटोमोबाईल इंडस्ट्रीच्या व्यवसायासाठी खासगी वित्तीय संस्थेकडून ऑक्टोबर 2012 मध्ये 50 लाख रुपयाचे कर्ज काढून देत असल्याचे आमिष दाखविले. यासाठी लागणार्‍या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तसेच रजिस्ट्रेशन व जामीनदारांच्या पूर्ततेसाठी 18 लाख रुपये घेऊन वारंवार वेगवेगळे आश्वासने देऊन कर्ज काढून देण्यास टाळाटाळ केली. त्यांना विचारणा केली असता, त्यांच्याकडून शिवीगाळ, दमदाटी करीत अंगावर धावून येत असल्याचे क्षीरसागर यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित कमलेश मेलवाणी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, अंबड पोलिस तपास करीत आहेत.