आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील परीक्षा विभागात 80 लाखांचा घोटाळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील विविध घोटाळे उघडकीस येत असताना विद्यापीठाच्या परीक्षा विभागातदेखील तब्बल ८० लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आला अाहे. विद्यार्थ्यांचे नाव, बैठक क्रमांकासह परीक्षा केंद्राची संपूर्ण माहिती छापील स्वरूपात असलेल्या उत्तरपत्रिका तयार करण्यात येणार हाेत्या. ४० लाख उत्तरपत्रिकांच्या छपाईला एका प्रतीसाठी रुपये असा दरही ठरला हाेता. प्रत्यक्षात मात्र काेऱ्याच उत्तरपत्रिका हाती पडल्याने तब्बल ८० लाख रुपये जास्त अदा केल्याचे उघडकीस अाले अाहे. 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू इ. वायुनंदन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पारदर्शक कारभाराकडे लक्ष दिले. त्यानंतर विद्यापीठातील सर्वच विभागांतील विविध घोटाळे उघडकीस येण्यास सुरुवात झाली आहे. यात संचालकांच्या बोगस पदव्यांसह विज्ञान अाणि तंत्रज्ञान विभागातील अभ्यासक्रमांचाही समावेश आहे. तसेच आता विद्यापीठाच्या परीक्षा विभागातही तब्बल ८० लाखांचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी लाख ५० हजार विद्यार्थ्यांच्या तब्बल ४० लाख उत्तरपत्रिका छापण्यासाठीचा ठेका दिला होता. यात विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती छापील असावी यासाठी विद्यापीठाकडून एका उत्तरपत्रिकेच्यामागे दाेन रुपये अधिक दिले होते. गेल्या वर्षी सर्व विद्यार्थ्यांना छापील उत्तरपत्रिकाही देण्यात आल्या. तसेच त्याप्रमाणे ठरवून देण्यात उर्वरित.पान १२ 

नियमांप्रमाणे काम दिले 
उत्तरपत्रिका छपाईसाठी ठेकेदाराला नियमाप्रमाणे ठेका दिला आहे. अटी शर्तींनुसार छापील स्वरुपात उत्तरपत्रिका देणे बंधनकारक आहे. ठेकेदाराला ९० टक्के बिल दिले आहे. १० टक्के बिल देणे बाकी आहे. नियमानुसार उत्तरपत्रिका मिळाल्या नाहीतर १० टक्के रक्कम आणि अनामत रक्कम जप्त केली जाईल. 
- एम.बी. पाटील, लेखा विभागप्रमुख, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ 
बातम्या आणखी आहेत...