आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसव्या गुंतवणूक योजना, पोलिस करणार जनजागृती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - केबीसी,इमू यांसारख्या गुंतवणूक योजनांतून किमान हजार कोटींचा गुंतवणूकदारांना गंडा घालण्याचे प्रकार शहर जिल्ह्यात उघडकीस येऊनही त्याच प्रकारच्या धर्तीवर वेगवेगळ्या कंपन्या नाव बदलवून अल्पावधीतच दामदुपटीच्या योजना आणत आहेत. यामध्ये ग्रामीण भागात मोठ्या संख्येने साखळी पद्धतीचा ऊहापोह केला जात असल्याने ग्राहकांच्या जागृतीसाठी आता पोलिसांनीच सकारात्मक पाऊल उचललेले आहे. यासाठी शहरी ग्रामीण पोलिसांनी प्रबोधन सुरू केले आहे.

फसव्या गुंतवणूक योजनांमधून हजारो गुंतवणूकदारांची होणारी फसवणूक त्यातून उद्ध्वस्त होणारे संसार, पोलिस तपासातही यामध्ये येणाऱ्या अनेक अडचणी यामुळे कायद्याच्या कचाट्यात येणारे गुन्हेगार, हे चित्र बदलण्यासाठी खोट्या गुंतवणूक योजनांतून अवास्तव गुंतवणुकीचा परतावा देण्याचे आमिष दाखविणाऱ्या कंपन्यांना आळा घालण्याचा चंग पोलिसांनी घातला आहे.

यासाठी आता थेट नागरिकांचेच प्रबोधन नाशिक पोलिसांनी सुरू केले असून, त्याकरिता मान्यवर सनदी लेखापाल, बँकांचे तज्ज्ञ यांनाही या मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे. फसव्या, आकर्षक, जास्त व्याजदराच्या योजना, कमी कालावधीत दामदुप्पट रक्कम देणाऱ्या योजना, शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकी, साखळी पद्धतीने रक्कम जमा करून लकी ड्रॉच्या योजना राबविणे, खासगी कंपन्या, संस्था यांच्यामार्फत चालविण्यात येणाऱ्या फसव्या पिग्मी योजना, फिक्स डिपॉझिट स्किम यांपासून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन नाशिक ग्रामीण पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

फसव्या योजनांपासून नागरिकांनी सावध राहावे
राज्यातकाही भामटे पैसे दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून, खोट्या स्किम काढून इतरांपेक्षा जास्त व्याजदराचे आमिष दाखवून हजारो लोकांची फसवणूक करीत आहेत. अशा योजनांपासून जनतेने दूर राहावे फसवणूक टाळावी, या उद्देशाने ही जनजागृती मोहीम राबविली जात आहे. संजय मोहिते, पोलिस अधीक्षक

अशी केली जाणार गुंतवणूक जनजागृती
फसव्यागुंतवणूक योजनांचे राज्यातील वाढते पीक बघता याबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी गुंतवणूक आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांची या मोहिमेकरिता मदत घेतली जाणार असून, टी.व्ही., केबल यांसारख्या माध्यमातून घराघरांपर्यंत ही जनजागृती प्रभावीपणे केली जाणार आहे.