आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाठग प्रदीप वाघचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - परदेशात ट्रेडिंग अाणि कमोडिटी मार्केटिंगच्या अाधारे शहरातील व्यावसायिकांना कोट्यवधींना गंडा घातल्याच्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेणाऱ्या संशयित प्रदीप वाघ याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. यावर निकाल देताना न्यायालयाने संपूर्ण प्रकरण गंभीर असून, सर्वाेच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार अार्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात संशयिताला अटक करून सखाेल तपासाचे पाेलिसांना अादेश दिले अाहेत.
या निर्णयामुळे संशयित वाघ यास काेणत्याही क्षणी अटक हाेण्याची शक्यता वर्तविण्यात अाली अाहे.
नाशकातील व्यावसायिक हुकूमत वालेचा आणि जगन पिंपळे यांच्यासह चार तक्रारदारांची काेट्यवधींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस अाला. याबाबतचे संपूर्ण कागदपत्रेही तक्रारदारांनी सादर केले अाहेत. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याबराबेरच अार्थिक गुन्हे शाखेकडे स्वतंत्र तपास साेपविला. दरम्यान, संशयित वाघ यांनी न्यायालयात अटकपूर्व अर्ज दाखल केला असता त्यावर सोमवारी न्यायाधीश अनिल खडसे यांच्यासमाेर सुनावणी झाली. यात सरकारी वकील राजेंद्र घुमरे अॅड. राहुल पाटील यांनी युक्तिवादात वाघ त्याचा साथीदार हे दाेघे वर्षभरात ३२ वेळा विदेशात गेल्याचे उघडकीस अाले अाहे. संशयिताने तक्रारदारासह किमान ५० व्यावसायिकांकडून ५०-५० लाखांची गुंतवणूक केली अाहे. या माेबदल्यात विदेशातील बँकांची विवरणपत्रे, खात्यात ४०० मििलयन जमा झाल्याच्या खाते पुस्तिका दाखविल्या अाहेत. तपासी अधिकाऱ्यांनी विदेशातील बँकांकडे पत्रव्यवहार केल्यावर विवरणपत्र बनावट अाढळले. यावरून संशयिताचे अांतरराष्ट्रीय टाेळीशी संबंध असल्याचे अाणि त्यांच्या मदतीने खाेटे लेटरहेड, विवरणपत्र तयार करून त्यांचीही फसवणूक केल्याचे सिद्ध हाेते. याअाधारे संशयिताचा अटकपूर्व फेटाळण्यात यावा, अशी मागणी केली.

न्या. खडसे यांनी अटकपूर्व फेटाळताना अांतरराष्ट्रीय टाेळीशी संलग्न असण्याची शक्यता अाणि बनावट विवरणपत्रे तयार करण्याचा प्रकार गंभीर असल्याचे म्हटले. या गुन्ह्यात गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून, पाेलिसांना सखाेल तपासासाठी संशयिताची पाेलिस काेठडी मिळणेही अावश्यक असल्याचे मत नाेंदविले. वाघने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत कागदपत्रे बनविल्याने फसवणूकीचा अाकडा किमान ३० ते ४० काेटींपर्यंत पाेहाेचला अाहे. त्याने नाशकातील प्रख्यात डाॅक्टर, विकसक, राजकीय मंडळींनाही गंडा घातल्याचे समजते.

सहा महिन्यांत दामदुपटीचे अामिष
वालेच्या यांच्या तक्रारीनुसार, विदेशातील वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा २५ टक्के व्याज अथवा सहा महिन्यांत दामदुपटीचे अामिष दाखविले. गुंतवणूक करताना कायदेशीर करार करून घेत हाेते. एवढ्यावरच थांबता वाघ याने ५० लाखांच्या पुढे गुंतवणूक करणाऱ्यांना थेट हाँगकाँग, घाणा इतर देशांची वारी करून अाणल्याचे तक्रारीत म्हटले अाहे.
बातम्या आणखी आहेत...