आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसव्या याेजनांचे पाेलिसांपुढे अाव्हान, फसव्यांचा शाेध घेण्याची माेहीम सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जादा व्याजदराचे अामिष दाखवून सर्वसामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक करण्याचा फाॅर्म्युला अाता नाशकातही जाेमात सुरू झाला आहे. केबीसी, इमू यांसारख्या गुंतवणूक योजनांतून किमान हजार कोटींचा गुंतवणूूकदारांना गंडा घालण्याचे प्रकार शहर-जिल्ह्यात उघडकीस येऊनही त्याच धर्तीवर वेगवेगळ्या कंपन्या नाव बदलवून अल्पावधीतच दामदुपटीच्या योजना आणत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरातील देवळाली कॅम्प, सिडको, सातपूर, जुने नाशिक यांसह विविध ठिकाणी वेगवेगळी आर्थिक प्रलोभने दाखवत नागरिकांना आकर्षित करणाऱ्या कंपन्या ‘लाखोंची बक्षिसे मिळवा’, ‘पैसे भरा, मेंबर गोळा करा’, ‘कार दुचाकी जिंका’, ‘परमेश्वराची पूजा सोडा आणि जोडी तयार करून हजारो रुपये मिळवा’ अशा जाहिराती करीत, तसेच गुंतवणुकीवर २४ टक्के व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक करीत आहेत. या कंपन्यांकडून स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर जाहिरात करून नागरिकांना पैसे गुंतवण्याचे आवाहन केले जात आहे. अशा कंपन्यांत आतापर्यंत हजारो नागरिकांनी पैसे गुंतवलेही असून, अनेकांची फसवणूक झाल्याचे उघडही झाले अाहे, तर काही नागरिकांना अाता अापली फसवणूक होण्याची शक्यता अधिक गडद झाल्याची चिन्हे दिसू लागली अाहेत.
प्रकरण :
सिडकोभागात एकामागे एक दोन मोठ्या फसवणुकीच्या घटना गेल्या महिन्यात घडल्या. शिक्षक भरतीच्या नावाने फसवणूक होण्याच्या प्रकारासह एअर इंडियात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने बेरोजगारांची सुमारे २७ लाखांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या दोन्ही फसवणुकीसंदर्भात अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सिडको पाथर्डी फाटा परिसरातील आठ युवकांना मुंबईच्या भामट्यांनी तब्बल २७ लाख ३५ हजारांना गंडा घातल्याचे या प्रकरणात समोर आले आहे. त्यांना एअर इंडियात मोठ्या पदावर नोकरी लावून देण्याचे अाश्वासन दिले हाेते. नोकरीबाबत प्रारंभी बेरोजगारांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर वारंवार पाठपुरावा केल्यानंतर फसवणूक उघड झाली.

नागरिकांत जनजागृतीचा अभाव
फसव्या गुंतवणूक योजनांचे राज्यातील वाढते पीक बघता याबाबत व्यापक जनजागृतीची गरज भासते. पाेलिसांनी अशी व्यापक माेहीम हाती घेऊन गुंतवणूकदारांना अार्थिक, सायबर क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेऊन घराघरांपर्यंत जनजागृती करणे गरजेचे अाहे. प्रत्यक्षात मात्र तसे हाेत नसल्याचेच दिसून येते.

नाव बदलून फसवणूक
केबीसी, इमू यांसारख्या गुंतवणूक योजनांतून किमान हजार कोटींचा गंडा घालण्याचे प्रकार उघडकीस अाल्यानंतर अाता त्याच धर्तीवर वेगवेगळ्या कंपन्यांनी नाव बदलून शहरात पुन्हा अल्पावधीतच दामदुपटीच्या योजना आणल्या असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समाेर अाले अाहे. कारवाईअभावी हे प्रकार वाढतच अाहेत.

पोलिसांनी लक्ष देण्याची गरज...
^शहरात दररोजकुठे तरी फसवणुकीचे प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे. कोणीही उठते अन‌् बोगस कंपनी तयार करते, नागरिकांची माेठी आर्थिक फसवणूक करून फरार हाेते. शहर ग्रामीण पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. पोलिसांनी विशेष पथकांद्वारे अशा कंपन्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, जेणेकरून फसवणुकीचे प्रकार टळतील. -रियाज सय्यद, नागरिक

‘खोट्या स्किम्स’ची नागरिकांना अामिषे
फ्लॅट, कार, बुलेट, दुचाकी, फ्रीज, अाेव्हन यांसह विविध लाखो रुपयांच्या वस्तू मिळतील, असे अामिष दाखवून नागरिकांकडून पाच हजारांपासून पंधरा हजारांपर्यंत पैसे घेतले जातात. पैसे घेतल्यानंतर संबंधितांना एक पावती दिली जाते. त्या पावतीवर असलेल्या क्रमांकाची सोडत दर पंधरा दिवसांनी केली जाते. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अनेक बक्षिसे लागतात अन‌् हे पाहून सर्वसामान्य नागरिक जाळ्यात अडकतात. मग अामिषाला बळी पडून फसवणूक हाेते.

अशा योजना आहेत सुरू
फसव्या, आकर्षक, जास्त व्याजदराच्या योजना, कमी कालावधीत दामदुप्पट रक्कम देणाऱ्या योजना, शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकी, साखळी पद्धतीने रक्कम जमा करून लकी ड्रॉच्या योजना राबविणे, खासगी कंपन्या, संस्था यांच्यामार्फत चालणाऱ्या फिक्स डिपॉझिट स्कीम, फसव्या पिग्मी योजनांसह विविध बाेगस योजना अाजही सुरू अाहेत.

प्रकरण :
नुकताचशहरातील गंगापूररोडवरील तीनशे कोटींच्या फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कंपनीच्या गुंतवणूकदारांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार एकाने तीन ते चार वर्षांपूर्वी ‘हाउस ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीची स्थापना केली होती. गुंतवणुकीवर २४ टक्के व्याजाचे आमिष संशयित संबंधितांनी दाखवून कंपनीच्या ३० एजंटांमार्फत तीन हजार २० गुंतवणूकदारांकडून ५० हजार रुपयांपासून तर एक कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करून घेतली. या गुंतवणूकदारांचा हा पैसा विनोद बुलियन्स दुबई, हाउस ऑफ अॅग्रो कम्युनिटी, हाउस ऑफ बिल्डकॉन, हाउस ऑफ इन्व्हेस्टमेंट, हाउस ऑफ बुलियन्स, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट अॅण्ड सर्व्हिसेस या कंपन्यांच्या माध्यमातून शेअर मार्केट तसेच बांधकाम व्यवसायात गुंतवित होता. परंतु, पाच ते सहा महिन्यांपासून त्याने व्याज देणे बंद केले होते. व्याज मिळत नसल्याने गुंतवणूकदारांनी रक्कम परत मागण्यास सुरुवात केली. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून या कंपनीला टाळे लावून संबंधित पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. गुंतवणूकदारांनी या कंपनीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर हा घोटाळा तीनशे कोटींच्यावर असल्याचे समोर आले.

प्रकरण :
नागरिकांनाविविध योजनांच्या नावाखाली पैसे दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांना फसविल्याचे अनेक प्रकार घडले असताना इंदिरानगर, पाथर्डी फाटा भागात पुन्हा एक प्रकार उघडकीस आला आहे. ‘पैसे भरा, मेंबर गोळा करा. यात कार दुचाकी जिंका’ अशा योजनेच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप सभासदांनी केला आहे. यातील महाठकाने दिलेले धनादेश वटल्याने हजारो सभासदांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी २०१६ मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. यासाठी काही एजंटांची नेमणूक करण्यात आली. यात सुरुवातीला १०० रुपये भरा, महिन्याच्या शेवटी सोडत निघून दुचाकीसह काही महागड्या वस्तू बक्षीस म्हणून मिळतील. यात मेंबर वाढल्यास कार, फ्रीज, कूलर विविध वस्तू मिळणार असल्याचे आमिष दाखविण्यात आले. या आमिषापोटी सभासदांनी पैसे भरण्यास सुरुवात केली. काही सदस्यांचा शेवटचा हप्ता म्हणून पुन्हा एक हजार रुपये भरण्यास सांगण्यात अाले. काहींना धनादेश दिले, तर काहींनी धनादेश वटल्याने ही फसवी योजना उघडकीस अाली.
असे आहेत प्रकरण
शहरात काही भामटे पैसे दामदुप्पट करण्याचे आमिषे दाखवून, खोट्या स्कीम काढून इतरांपेक्षा जास्त व्याजदराचे आमिष दाखवून लाखाे रुपयांची फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून वाढत असतानाच, अाता नाेकरी अन‌् गृहयाेजनांच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकारही वाढू लागले अाहेत. फ्लॅट, कार, बुलेट, दुचाकी यांसह विविध लाखो रुपयांच्या वस्तूंची अामिषे दाखवून सर्रास फसवणूक केली जात असताना पाेलिस प्रशासन मात्र केवळ ‘तक्रार करा... कारवाई करू’ म्हणून अाश्वस्त करण्यापलीकडे कुठलीही ठाेस कारवाई करीत नसल्याचे दिसून येत अाहे. त्यामुळे फसवणूक करणाऱ्यांचेही धारिष्ट्य वाढत असून, प्रशासनापुढील अाव्हान बिकट हाेत चालले अाहे.
अाम्ही पैसे भरताे, पण काही चांगली अाॅफर अाहे का?
बिनदिक्कतपणे पैसे भरा... अल्पावधीतच ते दुपटीने परत मिळतील, हा अामचा शब्द अाहे...
{ शहरात गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारची अामिषे दाखवून फसवणुकीचे प्रकार सुरू आहेत, त्यावर काय ठाेस उपाययोजना करणार?
-शहरात सुरू असलेल्या फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी अशा बोगस कंपन्यांची व्यक्तींची शोधमोहीम सुरू केली आहे.

{सिडको भागात गेल्या महिन्यात दोन मोठ्या फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत, त्याबाबत काय?
-नागरिक संबंधितांची कोणत्याही प्रकारची माहिती घेता लाखो रुपये गुंतवणूक करतात. यामुळे असे प्रकार घडतात. सिडकाेतही तेच झाले. नागरिकांनी अशा बोगस कंपन्यांत पैसे गुंतवणूक करता राष्ट्रीयीकृत बँकेत पैसे गुंतवावेत.

{पोलिसांमार्फत अशा घटनांचा तपास कोण करतात?
-अशा फसवणुकींचा तपास पोलिस प्रशासनाचाच इकोनॉमिक सेल बघतो आणि पोलिसही तपास करतात. गेल्या गुरुवारीच नाशिकरोड परिसरात अशा फसवणूक करणाऱ्यांना आम्ही ताब्यात घेतले आहे.
बातम्या आणखी आहेत...