आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएममधून लांबवले सहा जणांचे ~३ लाखनाशिकच्याग्राहकांचे पैसे काढले पनवेलच्या एटीएममधून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रेडक्राॅस सिग्नल आयसीआयसीआय एटीएममधून ते मे दरम्यान सहा ग्राहकांनी रक्कम काढल्यानंतर त्यांचेच सुमारे तीन लाख रुपये अाणि मे दरम्यान पनवेलच्या एटीएममधून काढल्याची खळबळजनक घटना उघड झाली अाहे.

या सर्व घटनांमध्ये एकच व्यक्ती फसवणूक झालेल्यांना एटीएममध्ये भेटली दुसरे एटीएम बंद असल्याचे सांगत एकाच मशीनमधून पैसे काढण्यास सांगितल्याचेही निष्पन्न झाले अाहे. ‘दरम्यान, ‘दिव्य मराठी’ने ग्राहकांच्या तक्रारीची दखल घेत शनिवारी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर फसवणूक झालेल्या ग्राहकांनी पाेलिसांत धाव घेतल्यानंतर शनिवारी सरकारवाडा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

एटीएम सेंटरमधून विविध ग्राहकांच्या खात्यातून लक्षावधी रुपये लांबविण्याचा प्रकार समाेर अाला अाहे. या प्रकारामध्ये ग्राहकांचे लाखो रुपये खात्यातून परस्पर लांबवल्यानंतरही संबंधित बँकेकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, या एटीएमबाहेर सिक्युरिटी गार्ड नसल्याने एकाच भामट्याकडून सर्व ग्राहकांना गंडविणे शक्य झाल्याचे संबंधित फसवणूक झालेल्या ग्राहकांनी ‘दिव्य मराठी’शी साधलेल्या संवादातून उघडकीस अाले अाहे. या घटनेमुळे एकप्रकारे बँक प्रशासनाबराेबरच पोलिस यंत्रणेलाही गुन्हेगारांकडून आव्हान देण्यात अाले अाहे.

या एमटीएमचा वापर केलेल्या ग्राहकांपैकी दीपक अाटाळे यांच्या खात्यातून ७५ हजार रुपये, भावना गायकवाड ८० हजार, हरीश कोतकर २९ हजार, जाहिद सय्यद १४ हजार, तर सोमनाथ निकम यांचे ५० हजार असे सुमारे तीन लाख रुपये मे राेजी रात्रीच्या वेळेस पनवेल येथील एटीएममधून काढण्यात अाले अाहे. फसवणूक झालेल्या ग्राहकांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
पनवेलएटीएममधून काढले पैसे फसवणूकझालेल्या ग्राहकांनी याबाबत चौकशी केली असता पनवेल येथील एटीएममधून वेगवेगळ्या वेळी माेठी रक्कम काढण्यात अाल्याचे स्पष्ट झाले. खात्यातून पैसे काढण्याचे मेजेस या मोबाइलवर आल्याने ग्राहकांना याबाबतची माहिती मिळाली.
एटीएमच्या लिमिटपेक्षाही काढले जादा पैसे
या फसवणूक प्रकरणातील काही नागरिकांच्या एटीएम लिमिटपेक्षाही जास्त पैसे संबंधित भामट्याने एकाचवेळी काढल्याचे निष्पन्न झाले अाहे. नागरिकांना गरज असतानाही त्यांचे एटीएम लिमिट अाेलांडून त्यांना कॅश मिळत नाही. इथे मात्र लिमिटच्या दुप्पट पैसे एकाचवेळी काढण्यात अाल्याचे दिसून येत असल्याने संबंधित भामट्याशी बँकांच्या एटीएम यंत्रणेशी संबंधित असलेल्या अातल्या माणसाचीही ‘सेटलमेंट’ अाहे काय? अशी शंका या फसवणूक झालेल्या नागरिकांनी व्यक्त केली.

‘दुसरे मशीन वापरा’
^त्या एटीएमसेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलाे असता, त्यात पैसे काढण्याच्या निमित्ताने उभ्या असलेल्या एका व्यक्तीने त्या कक्षातील दोनपैकी एक मशीन बंद असून, याच मशीनमधून पैसे काढण्यास सांगितले होेते. दीपक आटाळे, फसवणूकझालेले ग्राहक

पैसे काढल्याचा SMS
क्राॅससिग्नलवरील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममधून काही रक्कम काढली. दोन दिवसांनी खात्यातून थेट ५० हजार रुपये काढण्यात अाल्याचा माेबाइलवर मेसेज अाला. याबाबत संबंधित बँकेत चौकशी केली, मात्र काहीच उपयोग झाला नाही. सोमनाथ निकम, फसवणूकझालेले ग्राहक
बातम्या आणखी आहेत...