आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२० लाख दुप्पट करणे पडले चांगलेच ‘गरम’, राजकीय पदाधिकाऱ्याला चौघांकडून गंडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - पैसेगॅसवर गरम करून दुप्पट करून देताे, असे सांगून भामट्यांनी एका राजकीय पदाधिकाऱ्याला २० लाखांना गंडा घातल्याची घटना रविवारी सिडकोत घडली. या प्रकरणी चौघा संशयितांविरुद्ध अंबड पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
या प्रकरणी फिर्यादी हनुमंत उत्तरेश्वर धावणे (रा. कामटवाडे) यांनी अंबड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार धावणे यांचे परिचित धनसिंग चित्तसिंग शिरपाल (रा. काठे गल्ली, द्वारका) याने त्याच्या काही मित्रांनी पैसे दुप्पट करून देण्याची युक्ती असल्याचे सांगून धावणेंचा विश्वास संपादन केला. धावणे यांनी २१ जूनला २० लाख बँकेतून काढून अाणल्याची माहिती मिळताच धनसिंग शिरपाल, राजू पाटील विजयकुमार सिंग यांनी पैसे दुप्पट करुन देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार धावणे हे मित्रांना घेऊन त्यांच्या बहिणीच्या घरी कुणी नसल्याने चुंचाळे शिवार येथे गेले. तेथे संतोष जाधव, विजयकुमार यांनी धावणे यांच्याकडील २० लाख रुपये घेऊन एका प्लास्टिकच्या टपात ठेवले. त्यावर पाणी एक रसायन शिंपडले ते पैसे तीन भागांत पेपरमध्ये गुंडाळून ठेवले ते बंडल स्टीलच्या डब्यात ठेवून गॅसवर असल्याचे नाटक केले. धावणे यांना मेडिकलमधून कापूस अाणण्यासाठी पाठवले. ते परतल्यानंतर बंडल उद्यापर्यंत काढू नका, असे सांगून सोबत आणलेल्या साहित्यासह ते तेथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी डब्यात कागदी बंडल आढळून आले. या सर्व घटनेतील संशयित राजू कृष्णा भोईर उर्फ राजू पाटील (रा. भिवंडी, वाडा), विजयकुमार सिंग, धनसिंग चित्तसिंग शिरपाली (रा. नाशिक, द्वारका) त्यांच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. या प्रकरणी अंबड पाेलिस तपास करत अाहेत.

मारण्याची धमकी
विजयकुमार राजू पाटील यांच्याशी संपर्क साधून पैसे मागितले असता त्यांच्याकडून गोळी घालून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. यावरून हनुमंत धावणे यांना फसविल्याचे लक्षात अाले. त्यांनी अंबड पोलिसांत धाव घेऊन सर्व घटना सांगितली.
बातम्या आणखी आहेत...