आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बचत गटाच्या महिलांना ११ लाख रुपयांना गंडा, कर्ज काढून देण्याचे अामिष दाखवत महिलेने केली फसवणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अल्प गुंतवणुकीत प्रचंड परतावा देण्याच्या भूलथापांतून फसवणूक करण्याचे प्रकार सुरूच असताना, अाता बचत गटाचे कर्ज काढून देण्याचे अामिष दाखवत बचत गटाच्या महिलांची ११ लाख ४० हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला अाहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात संशयित महिलेच्या विरोधात फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच रोजगाराचे अामिष दाखवत म्हसरूळ येथील बेरोजगार महिलांना गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला होता.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि कल्पना शिवाजी हरीकमहाले (रा. योगेश्वर विहार, कामटवाडे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित वाहिदा इब्राहिम खान (नूर मंझिल, फिरदौस कॉलनी, औदुंबर स्टॉप) या महिलेने महिला बचत गटाच्या सदस्यांना कर्ज प्रकरण मंजूर करून देण्याचे अामिष दाखवले. शिवाय, कर्ज प्रकरण मंजूर झाल्यास पैसे परत करण्याचे अाश्वासनही दिले. त्यांच्यावर विश्वास बसल्याने हरीकमहाले यांनी त्यांना ४५ हजार रुपये दिले. खान यांनी त्यांना पाच लाखांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगून देवळाली व्यापारी बँकेचा धनादेश दिला. ताे बँकेत जमा केला असता वटताच परत आला. वेळोवेळी पैशांची मागणी केली असता संशयित खान हिने उडवाउडवीची उत्तरे दिली. उलट ‘पैशांसाठी बळजबरी करता, म्हणून तुमच्या विरोधात खंडणीची तक्रार करीन’, अशी धमकी दिली. अशाच प्रकारे सुलताना शेख यांच्याकडून तीन लाख, स्मिता नाईक यांंच्याकडून दाेन लाख, मीराबाई बेलदार यांच्याकडून दीड लाख, ऊर्मिला गायकवाड यांच्याकडून तीन लाख ७५ हजार, रंजना राजपूत यांच्याकडून ७० हजार असे १० लाख ९५ हजार रुपये, तर फिर्यादीचे ४५ हजार असा एकूण ११ लाख ४० हजारांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले अाहे. या प्रकरणी इतर महिलांचा पुरवणी जबाब पाेलिसांनी घेतला असून, या प्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. बचत गटांच्या आणखी काही महिलांची फसवणूक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पाेलिस ठाण्यात बचत गटाच्या महिलांची गर्दी
पोलिसठाण्यात बचत गटांच्या महिलांनी गर्दी केली होती. फसवणुकीचा आकडा २५ लाखांच्या वर जाण्याची शक्यता असून, वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.