आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉट्सअॅपवरून मोफत कॉलिंगची धूम सुरू, अपडेटेड व्हर्जनवर सुविधा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ज्या दिवसाची नेटिझन्स आतुरतेने वाट पाहात होते, तो अखेर मंगळवारी आला.. अन् व्हॉट्सअॅपवर दणाणून कॉल्स सुरू झाले. तर, काहींच्या चॅट विंडो स्प्लिट झाल्या.. मोबाइलमधील व्हॉट्सअॅप चॅट बॉक्समध्ये तीन पर्याय दिसू लागले आणि मोफतच्या व्हॉट्सअॅप कॉलिंगची सर्वत्र धूम सुरू झाली.

व्हॉट्सअॅपचे २.११.४७ नंतरच्या सगळ्या व्हर्जन्ससाठी व्हॉट्सअॅप कॉलिंग सुरू झाले आहे. व्हॉट्सअॅप कॉलिंगसाठी फक्त अपडेटेड व्हॉट्सअॅप आणि इंटरनेट कनेक्शनची गरज आहे. यापूर्वी फक्त काही मोबाइलवरही सुविधा होती. मात्र, मंगळवारी सगळ्याच मोबाइलवर व्हॉट्सअॅपमधले बग्ज काढून ही सुविधा देण्यात आली. एकंदरीतच सगळ्यांच्या मोबाइलवर दिवसभर फक्त अपडेट सुरू होते. नव्या मोबाइलमध्ये या अपडेट सुरुवातीपासून आहेत, तर जुन्या युजर्संना मात्र अपडेट बाहेरून कराव्या लागणार आहेत.
इंटरनॅशनल कॉल सुलभ
व्हॉट्सअॅप कॉलिंगच्या माध्यमातून तुम्हाला परदेशातही फ्री कॉलिंग करता येणार आहे. तुमच्या नेटवर्कवरील सुविधेनुसार फक्त इंटरनेटचे चार्जेस भरून या कॉलिंगचा वापर करता येणार आहे. त्यासाठी वेगळ्या इंटरनॅशनल कॉलिंग सुविधेची गरज पडणार नाही.
आयफोनला ठेंगा
ज्या व्यक्ती आपल्या आयफोनवर व्हॉट्सअॅप वापरतात, त्यांना मात्र व्हॉट्सअॅप कॉलिंगचा लाभ तूर्त घेता येणार नाही. व्हॉट्सअॅप अजूनही आयफोन ऑपरेटिंग सिस्टिमशी याविषयी चर्चा करत असल्याने त्यांनी आयफोनवर ही सुविधा देण्यास अवकाश असल्याचे सांगण्यात येते.
पुढे वाचा... कसे पाहावे व्हर्जन