आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवयवदात्यांच्या कुटुंबाला मिळणार माेफत उपचार, प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारचे पाऊल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महाराष्ट्रात अवयवदानाची चळवळ रुजवण्यासाठी अवयवदात्यांच्या कुटुंबीयांना आता कायमस्वरूपी माेफत उपचारांची सुविधा राज्य सरकारकडून मिळणार आहे. 

शासकीय रुग्णालय, मेडिकल कॉलेज, अायएमएच्या राज्यभरातील ४० हजार सदस्यांकडून त्यांच्या रुग्णालयात या कुटुंबीयांतील रुग्णांना माेफत उपचार मिळू शकतील. तसेच शस्त्रक्रिया, तपासण्या, अाैषधेही माेफत दिली जातील. याबाबत राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन म्हणाले की, अवयवदात्यांच्या कुटुंबीयांच्या सन्मानासाठी त्यांना माेफत उपचार मिळेल. अवयवदानाची तयारी दर्शवणाऱ्या दात्याच्या कुटुंबीयांचा ताेपर्यंतचा वैद्यकीय खर्च रुग्णालयासह सरकारनेही काही प्रमाणात उचलावा, याचा विचार सुरू अाहे. त्यांच्या मुलांना माेफत शिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण मंत्रालयाकडे प्रस्ताव दिला अाहे.

राज्यातील चित्र 
- २,६०० रुग्ण राज्यात यकृत मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत
- १२,००० रुग्ण किडनी प्रत्याराेपणाच्या प्रतीक्षेत
- १०० दातेही किडनीसाठी राज्यात उपलब्ध हाेत नाहीत
बातम्या आणखी आहेत...