आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिकरोड रेल्वे स्थानकात डिसेंबरमध्ये मोफत वायफाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- नाशिकराेड रेल्वेस्थानकात डिसेंबरमध्ये माेफत वायफाय सुविधा सुरू करण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. मध्य रेल्वेच्या मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा या स्थानकात बुधवारपासून (दि. २९) मोफत वायफाय सुविधा सुरू करण्यात आली आहे. 


रेल्वेतून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच, नोकरी करणाऱ्या युवकांची संख्याही अधिक असल्याने तंत्रज्ञानाच्या युगामध्ये या युवकांचा वेळ रेल्वे स्थानकामध्ये वेळ वाया जाऊ नये, तसेच गाडी येईपर्यंत त्यांची कामे पूर्ण व्हावीत यासाठी रेल्वे प्रशासनाने स्थानकामध्ये मोफत वायफाय सुरू करण्याचे घोषित केले होते. त्यानुसार भुसावळ विभागाने वायफाय सुविधा सुरू केली आहे. नाशिकरोडसह मध्य रेल्वेच्या खंडवा रेल्वे स्थानकामध्ये ही सुविधा डिसेंबरमध्ये सुरू करण्यात येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...