आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशकात स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्यांच्या स्मारकशिलेकडे दुर्लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या आणि कारावास भोगलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकशिलेकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. या परिसरात प्रचंड घाण झाली असून स्मारकशिलेच्या बाजूच्या जागेचा गैरवापर होत आहे. भगूर, देवळालीगांव, वडनेर दुमाला, नाशिकरोड परिसरातील 27 स्वातंत्र्यसैनिकांची नावे या स्मारकशिलेवर आहेत.

तत्कालीन नाशिकरोड देवळाली नगरपालिकेने दुर्गा गार्डनमध्ये स्वातंत्र्यसैनिकांची नावे असलेली ही शिला उभारली. त्याच्या चौफेर लावलेल्या होर्डिंगमुळे ती पूर्णपणे झाकली जाते. येथील पदपथावर अनधिकृत फळविक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. हे विक्रेते व इतर व्यावसायिक या शिलेच्या आजूबाजूला कचरा टाकतात. शिलेच्या चौफेर असलेल्या जागेचा वापर स्वच्छतागृह म्हणून केला जात असल्याचे चित्र आहे. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या शिलेसमोरील रस्त्यावरून अनेक लोकप्रतिनिधींचा रोजचा रहदारीचा रस्ता असताना त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. जवळपास 37 वर्षांपासून या शिलेच्या भोवतालचे सुशोभीकरण झालेले नाही.

14 मार्च 1976 रोजी तत्कालीन समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते व नगराध्यक्ष वि. तु. अरिंगळे, उपाध्यक्ष चं. रा. पिंपळे, शाम लालवाणी यांच्या उपस्थितीत शिलेचे उद्घाटन झाले होते.


गेटला ठोकले कुलूप

कुंपण घालून गेट लावलेले असतानाही जागेचा गैरवापर बघवत नाही. त्यामुळे गेटला स्वखर्चाने कुलूप ठोकले. पालिकेकडून केवळ क्रांतिदिनी स्वच्छता केली जाते. इतर 364 दिवस स्मारक दुर्लक्षितच राहते. जागेचा गैरवापर करणारे, कचरा टाकणार्‍यांशी नेहमी वाद होतात. गंगाधर उगले, सामाजिक कार्यकर्ते

बलिदान स्मरणात ठेवावे
शहिदांचे बलिदान कायम स्मरणात ठेवावे. भारतमातेच्या संरक्षणासाठी सैनिक नेहमीच तत्पर असतात. एस. सबरवाल, ब्रिगेडियर, कँटोन्मेंट बोर्ड