आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणावर मित्रानेच बंदूक असली की नकली, या वादातून गोळीबार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जखमी झालेला कृष्णा सूर्यवंशी - Divya Marathi
जखमी झालेला कृष्णा सूर्यवंशी
नाशिकरोड - नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या आंबेडकरनगर येथील महानंद डेअरीजवळ असलेल्या प्रीती अपार्टमेंटच्या खाली शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास एका तरुणावर मित्रानेच बंदूक असली की नकली, या वादातून गोळीबार केला. यावेळी सुटलेली बंदुकीची गोळी छातीच्या डाव्या बाजूला खांद्याला चाटून गेली. त्यामुळे हा तरुण जखमी झाला अाहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मद्याच्या नशेत बंदुकीतून गाेळी सुटल्याचे सांगितले जात असले, तरी या संशयित आरोपीला उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मातोश्रीनगर येथे राहणारा कृष्णा नंदकिशोर सूर्यवंशी आणि त्याचा मित्र प्रशांतप्रल्हाद पगारे (रा. प्रीती अपार्टमेंट, टागोरनगर) हे दोघे इमारतीच्या खाली पहाटे तीन वाजेपर्यंत बोलत होते. यावेळी प्रशांतने त्याच्याकडे असलेली बंदूक कृष्णाला दाखविली. त्याची चाचणी दाखविण्याच्या हेतूने त्याने हवेत गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी गाेळी सुटली नाही. हे पाहताच कृष्णाने ही बंदूक नकली अाहे, असा अाक्षेप घेतला. यावेळी प्रशांतने दुसऱ्यांदा गाेळी झाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुटलेली गाेळी छातीला डाव्या बाजूच्या दंडाला चाटून गेल्याने कृष्णा जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. पोलिसांनी संशयित प्रशांत पगारे याला अटक केली आहे. अधिक तपास पोलिस उपआयुक्त श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत, अतुल डहाके, निवांत जाधव आदी तपास करीत आहेत.

पुढे वाचा... अवैध शस्त्रे येत असल्यामुळे दहशत
बातम्या आणखी आहेत...