आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसासह चिंब अन् अधिक घट्ट हाेणार अाज बंध मैत्रीचे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अगदी लंगाेट यार म्हणा, शाळेतली दाेस्ती म्हणा की, काॅलेजमधली यारी... ‘ये तेरी मेरी यारी, ये दाेस्ती हमारी’ असे म्हणत वा ‘ही दाेस्ती तुटायची नाय’ असे म्हणत मैत्रीचे बंध रविवारी अधिक घट्ट हाेतील, तर काही ठिकाणी नवीन मैत्रीचं नातं या बंधनात स्वत:ला सामावून घेईल. अाॅगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा दिवस. पाश्चात्य संस्कृती जरी असली तरी अापल्याकडेही ती चांगलीच रुजली, त्यामुळेच कुठे क्लासमेट‌्सची दुनियादारी बघायला मिळेल, तर कुठे जुन्या अाठवणींना उजाळा देत एक उनाड दिवस साजरा केला जाईल अाणि त्याला साक्ष असेल ती श्रावणसरींची.
पोलिसांचीराहणार नजर : फ्रेंडशिपडे साजरा करताना तरुणाईने धुमाकूळ घालू नये तसेच कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कॉलेजरोड, गंगापूररोड, सोमेश्वर परिसरात पोलिसांची नजर राहणार आहे. तसेच, पोलिसांची गस्त दिवसभर या ठिकाणी राहणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
श्रावणसरीअन् तेरी मेरी यारी... : पाऊसहा प्रत्येकाचाच मित्र असताे अाणि ताे जर फ्रेंडशिप डेला बरसला तर मग अानंदाला उधाणच. असेच उधाण रविवारच्या फ्रेंडशिप डेलाही येणार अाहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरात चांगलाच पाऊस हाेताे अाहे. याच पावसाचा अंदाज रविवारसाठीही असल्याने तरुण-तरुणींच्या बेधुंद मनाच्या लहरींची अाणखीनच धमाल हाेणार अाहे. म्हणूनच पावसासह फ्रेंडशिप डे साजरा करायचा असे तरुणाईकडून नियोजन करण्यात येत होते.
सोशलमीडियावर चढला फीव्हर : सोशलमीडियावर फेंडशिप डे फीव्हर बघावयास मिळाला. दिवसभर मैत्रीविषयीची खास पोस्ट, इमेज, व्हिडिओ शेअर केले जात होते. त्यात तेरी मेरी यारी...., दोस्तीसाठी काय पण असे मेसेजेस सर्वांच्या इनबॉक्समध्ये फुल्ल झाले होते.
सामाजिकसंघटनेचेही अनोखे सेलिब्रेशन : फ्रेंडशिपडेचे औचित्य साधत सनविवि फाउंडेशन शहरातील विविध युवा संघटनेच्या वतीने अनोख्या पद्धतीने फ्रेंडशिप डे साजरा करण्यात येणार आहे. संस्थेच्या माध्यमातून अहिल्याबाई होळकर पूल अर्थात व्हिक्टोरिया पूल या ब्रिटिशकालीन १२५ वर्षांच्या पुलाबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे. तर, उधाण युवा ग्रुपतर्फे पूरग्रस्त कुटुंबांना मदत करून फ्रेंडशिप डे साजरा करण्यात येणार आहे.

फ्रेंडशिप बँड खरेदी करण्यासाठी गर्दी
मैत्रीचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी किंवा नवीन मित्र बनविण्यासाठी शनिवारी शहरातील कॉलेजरोड, गंगापूररोड, मेनरोड परिसरातील दुकानांमध्ये बँड घेण्यासाठी तरुणाईने गर्दी केली होती. आकर्षक वेगवेगळ्या प्रकारचे बँड खरेदी करण्याकडे तरुणाईचा विशेष कला होता.
‘फ्रेंडशिप डे’च्या पूर्वसंध्येला फ्रेंडशिप बँड खरेदीसाठी शहरातील दुकानांमध्ये अशी गर्दी झाली हाेती.
बातम्या आणखी आहेत...