आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘फ्रेंडशिप डे’ची धूम; सळसळत्या तारुण्याची पोलिस यंत्रणेला हुलकावणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पोलिस आले पोलिस आले. पळा पळा .. ए यार इकडे नको. एक काम कर तुम्ही भोंसलाच्या सर्कलपाशी थांबा. आम्ही फॉलो करतो आणि मग कुठेतरी जाऊ यात . हे आणि असेच उद्गार रविवारी कॉलेज रोडवर ऐकायला मिळत होते.. निमित्त होते फ्रेंडशिप डे चे !
सकाळपासूनच कॉलेजरोडवर तरूण-तरूणींनी रविवारची सुटी असूनही नेहमीसारखीच गर्दी केली होती. एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधत मैत्री दृढ व्हावी म्हणून शुभेच्छा दिल्या. धूम स्टाईल बाईक्सवर विलक्षण वेगाने फिरणारे राय़डर्स सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होते, पण त्याहीपेक्षा जपून चालण्यास भाग पाडत होते. असंख्य ग्रुप्सनी, फ्रेंडसनी कॉलेज रोड व परिसरातील कॅफे आणि हॉटेल्समध्ये रेंगाळत मैत्रीचा दिवस साजरा केला. दुपारनंतर मात्र पोलिसांनी कॉलेजरोडवर हजेरी लावली तरीही पोलिसांना चुकवत तरूण-तरूणींनी फ्रेंडशिप डे साजरा केला.
सोमेश्वर, नवश्या गणपती, सुला वाईन्स या भागात दिवसभर तरूणाई रेंगाळत होती. काही मुलामुलींनी तर सकाळपासूनच फ्रेंडशिप डे साजरा करण्याची तयारी केली. काहींनी फ्रेंडशिप बँड बरोबरच एकमेकांना गिफ्टस् आणि फुलं देखील दिले. पोलिसांनी कारवाई करूनही तरूण-तरूणींचा उत्साह सळसळून वाहत होता. सायंकाळी उशीरापर्यंत असाच माहौल कॉलेजरोड व परिसरात दिसून आला.
आज करणार फ्रेंडशिप डे साजरा
कॉलेजरोडपासून लांब राहणार्‍या विद्यार्थ्यांनी सोमवारी कॉलेजला आल्यानंतर फ्रेंडशिप-डे साजरा करणार असल्याची माहिती दिली. तसेच ग्रुपसोबत फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठीच केवळ सोमवारी कॉलेजला हजेरी लावणार असल्याचे कित्येकांनी सांगितले.
150 गाड्यांवर कारवाई
फ्रेंडशिप डे ला आमचा विरोध नाही पण मुले खूप दंगा करतात. आम्ही 750 वाहनांची तपासणी केली आणि त्यापैकी 150 गाड्यांवर कारवाई केली. स्कार्फधारक तरूणींवर देखील आम्ही कारवाई केली. गणेश शिंदे, सहायक पोलिस आयुक्त
सीसीडीवर टाइमपास
मित्रांच्या घरी गेलो आणि फ्रेंडशिप बँड बांधला सीसीडीवर टाईमपास केला. संध्याकाळी पुन्हा सगळे मिळून एकत्र फिरायला गेलो. प्रसाद माळी, विद्यार्थी, एमबीए