आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात मैत्रीदिनाचा जल्‍लोष, हुल्लडबाजी करणाऱ्यांना पोलिसांचा प्रसाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाेलिसांनी हुल्लडबाजांना लाठीचा चांगला प्रसाद दिला. - Divya Marathi
पाेलिसांनी हुल्लडबाजांना लाठीचा चांगला प्रसाद दिला.
नाशिक - विश्वास आपलेपणा जपणाऱ्या मैत्रीच्या अतूट नात्याचा उत्सव असलेला मैत्रीदिन अर्थात फ्रेंडशिप डे रविवारी शहरात तरुणाईने अतिशय उत्साहात साजरा केला. व्हॉट्सअॅप आणि फेसबुकसारख्या सोशल मीडियावरूनही मैत्रीभावना व्यक्त करणाऱ्या संदेशांची दिवसभर देवाणघेवाण सुरू होती. याशिवाय, चॉकलेट्स, गिफ्ट अशा भेटवस्तूंसह फुलांच्या देवाणघेवाणीतून फ्रेंडशिप बँड बांधून तरुणाईने मैत्रीच्या नात्याचे बंध अधिक दृढ केले.

सकाळपासूनच शहरातील विविध मॉल्स, हॉटेल्स, सिनेमागृह या ठिकाणी युवक-युवतींनी गर्दी केली होती. 'फ्रेंडशिप डे'चे निमित्त साधत नात्यातील गोडवा वाढविण्यासाठी चॉकलेट बुकेला मागणी केली जात होती. ऐरवी सुटीच्या दिवशी सामसूम राहणारा महाविद्यालयांचा कॅम्पस रविवारी मात्र 'फ्रेंडशिप डे'मुळे गजबजून गेला होता.
जुळले मैत्रीचे सोशल बंध : सिंहस्थात अहाेरात्र सेवा बजावणाऱ्या पाेलिसांसाेबत 'फ्रेंडशिप डे' साजरा करण्यात अाल्याचे महावीर इंटरनॅशनलचे अध्यक्ष अनिल नहार यांनी सांगितले. यावेळी पंचवटीतील कपालेश्वर चाैकीतील ८० ते ९० पाेलिस कर्मचाऱ्यांना फ्रेंडशिप बँड बांधण्यात अाले. जैन सोशल युवा फाेरमतर्फे आधाराश्रमातील मुलांसोबत फ्रेंडशिप डे साजरा करण्यात अाला. आधाराश्रमातील मुलांना भेटवस्तू देण्यात आल्या. फोरमच्या अध्यक्षा अश्विनी कांकरिया, सेक्रेटरी निहान कोचर, रोमील शहा, गिरीश बोथरा, सिद्धार्थ चोरडिया, विराज खाबिया आदी सहभागी होते.
'फ्रेंडशिप डे'च्या दिवशी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कॉलेजराेड, गंगापूररोड परिसरात रविवारी सकाळपासूनच पोलिस बंदोबस्त हाेता. यामुळे अनेकांनी सेलिब्रेशनसाठी आसारामबापू आश्रमरोड परिसराला पसंती दिली. मात्र, तरुणांनी या ठिकाणी दुचाकी, चारचाकी वाहनांवरून स्टंटबाजी करत हुल्लडबाजी सुरू केल्याने पादचारी वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या प्रकाराची माहिती मिळताच गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकर काळे पंचवटी ठाण्याचे नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कारवाईत २५ वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला, तर ४० ते ५० वाहनधारकांना दंड करण्यात आला.
सोशल मीडियावरही फ्रेंडशिप फिव्हर
'मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो, विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो', 'मैत्री असा खेळ आहे दोघांनाही खेळायचा असतो, एक बाद झाला तरी दुसऱ्याने डाव सांभाळायचा असतो...','निसर्गाला रंग हवा असतो, फुलांना गंध हवा असतो. माणूस हा एकटा कसा राहणार, कारण त्यालाही मैत्रीचा छंद असतो...', 'जिनके वजहसे मैं आज बिगडा हू, आज उन्ही कंबख्तों का दिन है।' असे अनेक मैत्रीचे नाते व्यक्त करणारे संदेश फेसबुक, व्हॉट्सअॅप या सोशल मीडियावर दिवसभर शेअर केले जात होते. अनेकांनी आपले व्हॉट्सचे डीपी म्हणून मित्राचे फोटो ठेवल्याने सोशल मीडियावरही फ्रेंडशिप डेचे फिव्हर होते.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, पोलिसांच्‍या कारवाईचे फोटो