आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिकमध्ये पोलिसांची गस्त, महाविद्यालयातील तरणाईचे सेलिब्रेशन मस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा तरुणाईचा उत्साह सोमवारी दुसर्‍या दिवशीही टिकून होता. पोलिसांची महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारावर गस्त होती. तसेच शहरातील तरुणांचे हॉट स्पॉट्स पोलिसांच्या पहार्‍याखालीच गजबजले होते. पोलिसांच्या या धाकामुळे हुल्लडबाजी करू पाहणार्‍या तरुणांनी मात्र कॉलेजरोडलगतच्या पाटील लेनसारख्या गल्ल्यांचा आसरा घेतला होता.

आसारामबापू आर्शमाजवळील उद्यानाजवळ येणार्‍या-जाणार्‍या प्रत्येक टू व्हीलर व फोर व्हीलरची चौकशी पोलिस करत होते. अठरा वर्षे पूर्ण न झालेल्या व लायसन्स नसूनही कारमध्ये आर्शमाजवळील रस्त्यावर हुल्लडबाजी करणार्‍या, रॅश ड्रायव्हिंग करणार्‍या मुलांना या वेळी दम भरण्यात आला. टू व्हीलरवरून तरुणांचे घोळके अगदी दुपारी 12 वाजेपासून या परिसरात दिसत होते. कॉलेजरोडही रविवारच्या तुलनेत सोमवारी सकाळी 10 वाजेपासूनच गजबजला होता. पोलिसांच्या धाकामुळे अनेकजण एका ठिकाणी ग्रुपने भेटण्यास टाळत होते. योग विद्या धामकडील वळणावर तरुण-तरुणी क्षणभर थांबून एकमेकांना बॅँड्स बांधत होते.

ट्रॅफिक जामचा फटका : कॉलेजरोड परिसरात ट्रॅफिक जाम झाल्याने वाहतुकीस दिवसभर अडथळा निर्माण होत होता. बीवायकेशेजारील चौक, येवलेकर मळा परिसर, इझी डे मॉल परिसर ते कॅनडा कॉर्नर, दिनशॉ आइस्क्रीम पार्लरलगतचा डिसूझा कॉलनीचा परिसर, डॉन बॉस्कोलगतच्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी दिवसभरात वाढत होती.

हुल्लडबाजी करणार्‍यांना दंड
‘फ्रेंडशिप डे’च्या दिवशी रविवारी हुल्लडबाजी व रॅश ड्रायव्हिंग करणार्‍या सहा तरुणांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. जयेश पवार (एमएच 15 सीएम 0239), गुळवंचकर (एमएच 15 सीटी 8088) व रामदास गोबांडे (एमएच 41 एसी 4327) यांना दंड करण्यात आला.

>पोलिसांनी चांगलाच निर्णय घेतला आहे. त्यांच्यामुळे बाहेरील विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातील विद्यार्थिनींना त्रास होत नाही. आजचा दिवस सुखासुखी साजरा करता आला, यात पोलिसांचा वाटा मोठा आहे. नेहमीपेक्षा जास्त सुरक्षित वातावरण कॉलेजरोडला होते. आज खर्‍या अर्थाने मजा करता आली. -अनया अमृतकर, बीवायके

आजचा फ्रेंडशिप डे सगळ्यात अविस्मरणीय होता. आम्ही मनसोक्त फिरू शकलो. कॉलेजरोडचे सगळे हॉट स्पॉट गर्दीने भरलेले होते. पोलिसांचा वावर असला तरी त्याने फारसा फरक पडला नाही.
- पूजा देशमुख, बीवायके

>आम्ही दुनियादारी पाहून हा दिवस साजरा केला. मैत्री दिनाला खास मैत्रीवरील सिनेमा पाहण्याची मजा निराळी होती. पोलिस असल्याने थोडी धाकधूक वाटत होती; पण त्यांचा त्रास जाणवला नाही.
- संस्कृती क्षिरे, एचपीटी

>पोलिसांचा त्रास होत होता. त्यांचे काहीतरी वेगळेच सुरू होते, असे वाटले. त्यांना फार न जुमानता काही मुलं फ्रेंडशिप डे साजरा करत होते. त्यामुळे मला तरी फार परिणाम झाल्याचे जाणवले नाही.
- रोहन पोरजे, विद्यार्थी