आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ता सुरक्षा अभियान शहरात आजपासून, २३ जानेवारीपर्यंत जनजागृतीपर उपक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - प्रादेशिक परिवहन विभागाच्या रस्ते सुरक्षा अभियानांंतर्गत विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि. ११) सकाळी नियोजन भवन येथे पोलिस आयुक्तांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन होत आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाच्या रस्ते सुरक्षा अभियानास रविवारी महिलांच्या हेल्मेट रॅलीने प्रारंभ झाला. सोमवारी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ होणार आहे. कार्यक्रमास जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, उपायुक्त विजय पाटील, प्रशांत मोहिते यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अभियानांतर्गत हेल्मेट, सीटबेल्ट आणि वाहतूक नियम रस्ता सुरक्षाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. सुरक्षेसंदर्भात पोस्टर्स लावणे, वाहन तपासणी मोहीम, शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी, चालकांसाठी नेत्र आरोग्य तपासणी शिबिर, महाविद्यालयांमध्ये प्रबोधन, रिफ्लेक्टर तपासणी मोहीम, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, मोटार ड्रायव्हिंग स्कूल प्रशिक्षकांसाठी कार्यशाळा, चालकांच्या आरोग्यावर चर्चासत्र, स्कूल बसचालक ग्रामीण भागातील वाहनचालकांसाठी कार्यशाळा, बैलगाडी, ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर लावणे हे उपक्रम २३ जानेवारीपर्यंत राबविले जातील. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड, उपप्रादेशिक अधिकारी भरत कळसकर यांनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...