आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • From Today Social Audit For Water Supply Management

पाणीपुरवठ्याच्या नियाेजनासाठी शहरात अाजपासून साेशल अाॅडिट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पाणीसाठा कमी असतानाही उपलब्ध लाेकसंख्येला मुबलक पाणी मिळावे, यासाठी महापालिका प्रशासनाने पाऊल उचलले असून साेशल अाॅडिटच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात किती पाणीपुरवठा होतो याची माेजणी केली जाणार अाहे. महत्त्वाचे म्हणजे या कामासाठी महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांसह अभियंते अभियांत्रिकी महाविद्यालयांची मदत घेण्याचे नियाेजन केले अाहे. शनिवारी (दि. २) सकाळी वाजेपासून रविवारी सकाळी पर्यंत ही प्रक्रिया राबविण्यात येणार अाहे. त्यासाठी विशिष्ट नमुन्यात अर्ज तयार करण्यात अाले असून, त्यात माहिती भरून महापालिकेच्या अभियंत्यांकडे द्यावी लागणार अाहे.
यंदा गंगापूर धरणात नेहमीपेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीच्या जलनियोजनासाठी शहराच्या विविध भागात किती पाणीपुरवठा होतो याची प्रत्यक्ष अंदाजे मोजणी करणे शक्य आहे. सद्यस्थितीत गंगापूर धरण दारणा नदी अशा दोन ठिकाणातून प्रतिदिन ३५० दशलक्ष लिटर पाण्याची उचल होत आहे. शहराची लोकसंख्या १७ लाख तरंगती (अस्थायी) लोकसंख्या लाख अाहे. याचा विचार केल्यास हाेणारा पाणीपुरवठा प्रतिदिन प्रतिमाणसी १८४ लिटर होतो. तथापि, यंत्रणेत गळती, चोरी यासारखा प्रकार असतो. तसेच इतर संस्थांच्या पाण्याच्या अतिरिक्त गरजा असतात. यामुळे प्रत्यक्षात ग्राहकांच्या घरापर्यंत पाणी पुरेशा प्रमाणात जात नाही. शहराच्या विविध भागात किती पाणी जाते, याची मोजणी यानिमित्ताने करणे आवश्यक आहे.
नाशिकमध्ये एकूण जलशुद्धीकरण केंद्र आहेत. या ठिकाणांहून ९४ जलकुंभांना पाणीपुरवठा होतो. तेथून पुढे नागरिकांना पाणी मिळते. पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी प्रत्यक्षात वेगवेगळ्या टप्प्यावर किती पाणीपुरवठा होतो, ते तपासणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेमार्फत पाणीपुरवठ्याचे सामाजिक अंकेक्षण (साेशल अाॅडिट) होणार आहे. त्यादृष्टीने पुढील प्रक्रिया करणे प्रस्तावित आहे. यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी, इच्छुक अभियंते तसेच लोकप्रतिनिधी नागरिकांची मदत घेतली जाणार अाहे. तसेच, नगरसेवक नागरिकांनीही सहभागी हाेण्याचे आवाहन अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी केले अाहे.

अर्ज जलकुंभावर उपलब्ध असतील
शहरातील प्रत्येक म्हणजे ९४ जलकुंभावर पाणीपुरवठ्याचे माेजमाप करण्यात येणार अाहे. नागरिकांनी शनिवारी पहाटे ते रविवारी पहाटे या दरम्यान येऊन पाण्याची पाहणी माेजमाप करायचे अाहे. याच ठिकाणी अर्जदेखील उपलब्ध करून देण्यात अाले अाहे.

शहरातील विविध जलशुद्धीकरण केंद्रावर २४ तासांत किती पाणी पोहोचते त्यापैकी किती पाणी पुढे वितरण व्यवस्थेत विविध जलकुंभाद्वारे पाठविले जाते याचे मोजमाप करणे.
शहरातील विविध ९४ जलकुंभावर २४ तासांत किती पाणी पोहोचते याचे मोजमाप करणे.
जलकुंभांवरून त्या-त्या प्रभागात पुढे पाणीपुरवठा होतो. एका टाकीवर सरासरी २० हजार नागरिक अवलंबून आहे. तथापि, लोकसंख्या ही संख्या कमी-अधिक असल्यामुळे प्रत्येक टाकीपासून पुढील भागाचा मुख्य वितरण व्यवस्थेचा कच्चा नकाशा काढण्यात येईल. जलकुंभाच्या वितरण क्षेत्रातील चार-पाच घरांत प्रत्यक्ष किती पुरवठा होतो हे मोजले जाईल. यामुळे प्रत्यक्षातील पाणीपुरवठ्याचे चित्र स्पष्ट होईल.

पाणीपुरवठा योजनेच्या नवीन कामांवेळी अडचणी असलेल्या भागाला प्राधान्य देता येईल. आगामी उन्हाळ्याच्यादृष्टीने उपलब्ध पाणी पुरविण्याचे नियोजन शक्य होईल. अनधिकृतपणे पाणी उचलणाऱ्या जागा, व्यक्ती लक्षात येतील.