आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शिष्यवृत्ती’ प्रकरणी उद्यापासून आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्काचे प्रदान या योजनांची विशेष चौकशी पथकामार्फत चौकशी सुरू आहे. या चौकशीमध्ये या पथकाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचा छळ होत असल्याचा आरोप करत १२ सप्टेंबरपासून राज्यभरात सामाजिक न्याय विभागातील कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन पुकारले आहे.

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्काचे प्रदान या योजनांची विशेष चौकशी पथकाच्या पुढे कुठल्याही अधिकाऱ्याची सुनावणी होत नाही. थेट गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया एसआयटी अवलंबित आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी धास्तीत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री, मुख्य सचिव यांच्यापुढे अधिकाऱ्यांनी समस्या मांडल्यानंतरही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यभर सामाजिक न्याय विभागात संताप व्यक्त होत अाहे. अधिकारी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात असून १२ सप्टेंबरपासून राज्यभर सामाजिक न्याय विभागात लेखणीबंद आंदोलन छेडण्यात आले आहे.

विशेष चौकशी पथकाच्या आदेशावर सचिव आयुक्त हे समाजकल्याण विभागाच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना शैक्षणिक संस्थेवर गुन्हे नोंदविण्याचे निर्देश देत आहे. अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यास अधिकाऱ्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. हा प्रकार दोषपूर्ण असून अधिकारी, कर्मचारी विशेष चौकशी पथकामुळे धास्तीत आहे. शासनाकडे निवेदन देऊनही दखल घेतलेली नाही. १२ सप्टेंबरपासून राज्यभरात सामाजिक न्याय विभागात लेखणीबंद आंदोलन केले जाणार अाहे.
पथकाला फक्त चौकशीचा अधिकार
शिष्यवृत्ती शिक्षण फी, परीक्षा फी योजनेच्या चौकशीकरीता नियुक्त विशेष चौकशी पथकाची स्थापना करण्यासाठी जो शासन निर्णय झाला आहे, यात अनियमितता शोधून काढणे, अनियमितता होण्यासाठी उपाययोजना सुचविणे हे कामाचे स्वरूप नमूद केले आहे. परंतु, हे पथक कार्यकक्षा ओलांडून गुन्हे नोंदविण्याचे आदेश देत आहे.
बातम्या आणखी आहेत...